Kurla Best Bus Accident: अद्याप बेस्ट बससेवा बंद; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

86
मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस (Kurla LBS) मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या २० ते २२ वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. या बेस्ट बस दुर्घटनेनंतर (Best bus accident) खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारीही बेस्टची सेवा बंद होती. मात्र, याचा फटका कुर्ला रेल्वे स्थानकातून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), अंधेरी आणि सांताक्रुझ येथे ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला. त्यामुळे प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे (Kurla Auto-Taxi fare) आकरल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.   (Kurla Best Bus Accident) 

कुर्ला रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या सर्वच बेस्ट बस कुर्ला डेपोपर्यंत चालविल्या जात असल्याने प्रवाशांना कुर्ला डेपोपासून रेल्वे स्थानकापर्यंत पायपीट करावी लागत होती. तर, रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, कुर्ला बेस्ट बस (Kurla Best Bus) स्थानकातून अंधेरी, सांताक्रुझ, बीकेसी, पवई या ठिकाणी बस धावतात. गेल्या दोन दिवसांपासून बेस्ट बस स्थानकाव्यतिरिक्त कुर्ला डेपोतून बस सोडल्या जात आहेत. तसेच, येणाऱ्या बसही डेपोपर्यंत येत आहे. त्यामुळे कुर्ला डेपो, कलिना, एमटीएनएल, म्हाडासह कल्पना सिनेमा, शीतल सिनेमा, बैलबाजार, जरीमरीसह साकीनाक्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

(हेही वाचा – One Nation, One Election चा मार्ग मोकळा; केंद्रीय मंत्रिमंडळात विधेयकाला मंजुरी)

प्रवासी भाडे किती ?
मीटर रिक्षा
कुर्ला ते अंधेरी    ३०० रुपये
कुर्ला ते बीकेसी   १३० रुपये

शेअर रिक्षा (भाडे प्रति प्रवासी)
कुर्ला ते बीकेसी            ५० रुपये
कुर्ला ते म्हाडा ऑफीस     ५० रुपये

(हेही वाचा – वीर हुतात्मा Babu Gainu यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु महासभेच्या वतीने अभिवादन)

विद्याविहार, घाटकोपरहून प्रवास
कुर्ल्यातील बस बंद असल्याने प्रवासी विद्याविहार, घाटकोपरला उतरून बसने प्रवास करत होते. बससोबत शेअर व मीटर रिक्षाकरिता मोठी गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.