राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचा बुधवार, १२ डिसेंबरला ८४वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले, इतकेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार हे कधीही, केव्हाही सत्तेच्या बाजूने जाण्यासाठी उत्सुक असतात. केंद्रात मोदी सरकारला काठावरचे बहुमत आहे. त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या बेभरवसा असलेल्या नेत्यांचा पाठिंबा आहे. केंद्रात भक्कम सरकार असावे म्हणून शरद पवारांच्या १० खासदारांकडे मोदी सरकारचे लक्ष आहे. तसेच वाढदिवसाच्या (Sharad Pawar Birthday) निमित्ताने शाह आणि पवार यांच्या झालेल्या भेटीमागे अनेक विषयावर चर्चा रंगू लागल्या आहेत. (Sharad Pawar)
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह ६ जनपथ निवासस्थानी दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार केला, तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची ६ जनपथ निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, चिरंजीव पार्थ पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये कटुता आली होती. दरम्यानच्या दोन रक्षाबंधन आणि दिवाळी सणाला अजित पवार यांनी कुटुंबीयांना भेटणे टाळले होते.
(हेही वाचा – गोमांस द्या नाहीतर हॉटेल बंद करा; Bangladesh मध्ये आता धर्मांध मुसलमानांचे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचे षड्यंत्र)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. ईश्वराने त्यांना जनसेवेसाठी अधिकाधिक बळ आणि दीर्घायुष्य द्यावे, अशा मनोकामना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे? अशा चर्चांनाही सुरुवात झाली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community