Datta Jayanti निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

31
Datta Jayanti निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) उत्सव देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने दत्ताच्या उपासनेसह अध्यात्म, साधना आणि अन्य विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती मिळावी, यासाठी दत्त जयंतीच्या निमित्ताने शनिवार, १४ डिसेंबरला सनातन संस्थेच्या वतीने देशातील अनेक राज्यांत विशेष ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणी ही ग्रंथप्रदर्शने लावण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident: अद्याप बेस्ट बससेवा बंद; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट)

या ग्रंथप्रदर्शनांवर दत्तगुरुंच्या नामजपाचे महत्त्व, पूर्वजांचा त्रास दूर होण्यासाठी दत्ताची उपासना का करावी ? दत्तगुरुंनी केलेले २४ गुणगुरु कोणते आणि त्यांच्याकडून ते काय शिकले ? आदी दत्तगुरुंविषयी माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध असतील. ‘दत्त’विषयक ग्रंथांसह अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य, प्रथमोपचार आदी विषयांवरील ग्रंथ तसेच दत्ताच्या नामजपाच्या पट्ट्या, दत्ताचे सात्त्विक चित्र यांसह सनातनची सात्त्विक उत्पादने सनातन संस्थेच्या वतीने या ग्रंथप्रदर्शनांवर उपलब्ध असतील. (Datta Jayanti)

(हेही वाचा – गोमांस द्या नाहीतर हॉटेल बंद करा; Bangladesh मध्ये आता धर्मांध मुसलमानांचे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचे षड्यंत्र)

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांची काही महत्त्वाची ठिकाणे : (वेळ : सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत)

१. श्री. दत्त मंदिर, प्रभादेवी
२. दाभोलकर दत्त मंदिर, विल्सन महाविद्यालयाच्या मागे, गिरगाव
३. श्री. गुरुदेव दत्तमंदिर, खांडवाला कंपाऊंड, वाकोला पाईप लाईन, सांताक्रुझ (पू.)
४. दत्त मंदिर, हनुमान रोड, विलेपार्ले (पू.)
५. ब्रम्हा, विष्णू, महेश, दत्त मंदिर, शिंपोली गाव, बोरिवली (प.)
६. दत्त मंदिर, डहाणूकर वाडी, कांदिवली (प.).
७. दत्त मंदिर, म्हात्रेवाडी, दहिसर (प.)
८. दत्त मंदिर, सानपाडा गाव
९. दत्त मंदिर, एम. बी. इस्टेट, विरार (प.)
१०. दत्त मंदिर, श्री जोशींचे मंदिर चिंचणी, तारापूर रोड

(हेही वाचा – Vidya Thakur यांचा पत्ता कट होणार?)

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनांना अवश्य भेट द्यावी तसेच वरील ठिकाणासह अन्य ठिकाणच्या ग्रंथप्रदर्शनाविषयी माहिती हवी असल्यास 9320003560 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. (Datta Jayanti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.