Parliament Session : संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ

64
Parliament Session : संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ
  • खास प्रतिनिधी 

संसदेचे अधिवेशन गुरुवारी देखील विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गोंधळामुळे दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. तर भाजपाने देखील जॉर्ज सोरोस प्रकरणावरून काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले. अदानी प्रकरण आणि कथित काँग्रेस-सोरोस लिंकच्या आरोपांव्यतिरिक्त ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला. तर राज्यसभेत सोरोस प्रकरणाव्यतिरिक्त अविश्वास प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Parliament Session)

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident: अद्याप बेस्ट बससेवा बंद; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट)

भाजपाचा लोकसभा खासदारांना व्हिप

13 आणि 14 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. या काळात दोन्ही सभागृहात काही महत्त्वाच्या कायदेविषयक कामांवर चर्चा होणार आहे. (Parliament Session)

(हेही वाचा – गोमांस द्या नाहीतर हॉटेल बंद करा; Bangladesh मध्ये आता धर्मांध मुसलमानांचे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचे षड्यंत्र)

काँग्रेसचा अराजकता आणण्याचा प्रयत्न

भाजपा खासदार जगदंबिका पाल म्हणाल्या की, ‘सदनाचे कामकाज सातत्याने विस्कळीत होत आहे. राज्यसभेचे कामकाज केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळावर म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत राज्यसभेच्या सभापतींवर आरोप केले, हे निषेधार्ह आहे. हे दुर्दैवी आणि हास्यास्पद आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना सभागृहात बोलण्याची पूर्ण संधी देण्यात आली मात्र त्यांनी नकार दिला. त्यांना अनेकदा चेंबरमध्ये बोलावूनही ते गेले नाहीत. यावरून काँग्रेसला सभागृहात सहकार्य करायचे नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसचा अराजकता आणण्याचा प्रयत्न करतात. (Parliament Session)

(हेही वाचा – Sambhal प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ वकील Vishnu Shankar Jain यांना जीवे मारण्याची धमकी)

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी विचारले काँग्रेसला हे प्रश्न : 
  1. काश्मीरला वेगळा देश मानणाऱ्या संघटनेशी राहुल गांधींचे काय संबंध आहेत.

2. सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचा संबंध काय?

3. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि जॉर्ज सोरोस यांचा संबंध काय?

4. सोरोस आणि गांधी कुटुंबाचा काय संबंध?

5. सोरोस यांनी सर्वाधिक पैसा राजीव गांधी फाऊंडेशनला का दिला?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.