देशभर बुधवार, ११ डिसेंबरला गीता जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये पुण्यातील ‘हर घर सावरकर समिती’ च्या कार्यकर्त्यांनी सावरकरप्रेमींनी ज्या अनोख्या पद्धतीने गीता जयंती (Geeta Jayanti) साजरी केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
View this post on Instagram
‘हर घर सावरकर समिती’ च्या सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांनी पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना मोफत गीता ग्रंथाचे (Geeta Jayanti) वितरण केले. हा गीता ग्रंथ खिशात राहील इतका छोटा होता. लोकांना गीता ग्रंथ देऊन अनोख्या पद्धतीने गीता जयंती साजरी करण्यात आली. यावेळी या सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांनी तरुणांना हे ग्रंथ वितरित केले.कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता (Geeta Jayanti) सांगून जीवनाचे सार सांगितले. त्यामुळे याचे जीवनात अनन्य महत्व आहे, म्हणून आम्ही गीता ग्रंथ सर्वांनी अभ्यासला पाहिजे, असे हे कार्यकर्ते सांगत होते.
Join Our WhatsApp Community