मुंबई – पवई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत ३ कोटींचा कश्मिरी चरस (Kashmiri Charas) या अमली पदार्थासह एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत ड्रग्स तस्कर (Drug traffickers) असून यापूर्वी देखील त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळून आला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
मोहम्मद सादिक हनिफ सय्यद (४६) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्कराचे नाव आहे.पवई पोलीस ठाण्याचे (Powai Police Station) सपोनि. संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक हे त्यांच्या पथकासह पवईतील निटी पोस्ट, विहार सरोवर येथे गस्त घालत असताना त्या ठिकाणी एक मोटार संशयास्पद रित्या उभी असलेली आढळून आली. पोलीस पथकाने मोटारीत बसलेल्या इसमाला बाहेर काढून त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला, पोलिसांनी त्याच्या मोटारीची झडती घेतली असता ६ किलो ३२ ग्रॅम चरस हा अमली पदार्थ आणि एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला.
हेही पाहा –