- प्रतिनिधी
मुंबईतील उपनगरात प्रवाशांची लूट करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०९९ रिक्षाचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असून, ४२६ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी उपनगरातील विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Mumbai Traffic Police)
(हेही वाचा – Hawker : मुंबईतील २० ठिकाणे पुन्हा दिसणार फेरीवालामुक्त)
मुंबईतील उपनगरात वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्तपणे रिक्षा चालवणे, प्रवाशी भाडे नाकारणे, विना परवाना रिक्षा चालवणे या प्रकारच्या अनेक तक्रारींनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील काही दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मुंबई वाहतूक पोलिसांनी पूर्व, पश्चिम आणि उत्तर मुंबई उपनगरात ९ डिसेंबरपासून रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केली होती. (Mumbai Traffic Police)
(हेही वाचा – BMC: आपल्या घराच्या बांधकातील राडारोडा पडला असेल तर वाहून नेण्यासाठी साधा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क)
मागील तीन दिवसांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २०९९ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कुठलाही परवाना नसताना रिक्षा चालवणारे, तसेच १५ वर्षांपुढील ४२६ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. (Mumbai Traffic Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community