कुर्ला बेस्ट बसच्या (Kurla Bus Accident) भीषण अपघाताच्या दोन दिवसांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) दिलेल्या प्राथमिक माहितीमध्ये बस मध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता, हा अपघात मानवी चुकीमुळेच झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. कुर्ला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आरटीओच्या अहवालामुळे बसच्या फिटनेस विषयीच्या अनुमानांना पूर्णविराम मिळाला आहे, तसेच अपघाताच्या वेळी चालक संजय मोरे (Driver Sanjay More) याची मानसिकता काय होती, तो मानसिक हे तपासण्यासाठी त्याच्या कुटूंबियांकडे अधिक चौकशी करण्यात येत आहेत. (Kurla Bus Accident)
कुर्ला पश्चिम (Kurla West) येथील एस.जी. बर्वे मार्ग येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. पोलिसांनी अटक केलेल्या बस चालक संजय मोरे याचे प्रथम वैद्यकीय चाचणी केली असता त्यात पोलिसांना त्याच्या रक्तात अल्कोहोल मिळून आले नसल्यामुळे चालकाणे मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (RTO) बसचे ब्रेक तपासले असता ते देखील सुव्यवस्तीत होते. अखेर बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे का? हे तपासण्यासाठी आरटीओच्या एका पथकाने दोन दिवस संपूर्ण बसची तपासणी केली. तसेच आरटीओच्या या पथकाला बसमध्ये कुठल्याही प्रकारे तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचे आरटीओने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत कळवले, आरटीओच्या अहवालामुळे बसच्या फिटनेस विषयीच्या अनुमानांना पूर्णविराम मिळाला (Kurla Best Bus Accident RTO Report) आहे. अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या बस चालक संजय मोरेने बुधवारी पोलिसांना सांगितले की, त्याला ओला भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराने फक्त ई-बसमध्ये तीन फेऱ्यांचे प्रशिक्षण दिले होते. हे बेस्टच्या वाहतूक नियमाच्या विरुद्ध आहे. ज्यात चालकांना मॅन्युअल ते ई-बस पर्यंत सहा आठवड्यांचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. संजय मोरे याने पोलिसांना सांगितले की, बस त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यांना काय करावे हे समजत नव्हते, परंतु त्याने दिलेली माहिती आम्ही पडताळून पहात आहोत, असे पोलिसांनी सांगितले, तसेच त्याचा कोणाशी काही वाद झाला आहे का हे समजून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबाशी आणि सहकाऱ्यांशी बोलू असे पोलीस उपायुक्त गणेश गावडे (DCP Ganesh Gawde) म्हणाले.
(हेही वाचा – राज्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी उभारणार निवारा केंद्र; State Govt कडून ८ कोटी ६४ लाखांच्या निधीची तरतूद)
अपघाताच्या वेळी बस ताशी ६० किमीच्या वेगाने धावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. “मोरे यांना ड्रायव्हिंगचा प्रदीर्घ अनुभव असला तरी त्यांनी स्वयंचलित ई-वाहन चालवलेले नाही,” असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. या अपघाताच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे २५ जणांचे जबाब नोंदवले असून, लवकरच आणखी जबाब नोंद होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या निवेदनात, कंडक्टरने असा दावा केला आहे की तो बसच्या मागील बाजूस असल्याने “ड्रायव्हर किंवा वाहनाचे काय झाले याबद्दल त्याला माहिती नाही”, कारण तो बसच्या मागील बाजूस होता. बसने एका वाहनाला धडक दिल्यानंतर प्रवासी घाबरल्याचे पाहून त्याने पोलिसांना सांगितले, त्याने बस थांबवण्यासाठी बेल वाजवली, ज्याकडे चालकाने दुर्लक्ष केले.
हेही पाहा –