“एकनाथ शिंदे नाराज असते, तर…”, Sanjay shirsat स्पष्टच बोलले

79
"एकनाथ शिंदे नाराज असते, तर...", Sanjay shirsat स्पष्टच बोलले

महायुती सरकारच खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर आता शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा-Allu Arjun Arrested : ‘पुष्पा 2’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक !

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय शिरसाट (Sanjay shirsat) म्हणाले, “कसल्याही प्रकारची नाराजी वैगेरे नाही. त्यांचा स्वभाव तडक-फडक आहे. शिंदे जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. त्यांनी सरळ सांगितले आहे की, तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यामुळे एवढे सर्व झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही. शिंदे नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. शिंदे आणि बावनकुळे यांची काल भेट झाली. आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत आणि महायुती म्हणूनच हे सरकर स्थापन होणार आहे. त्यात कुणीही अडसर आणणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.” (Sanjay shirsat)

हेही वाचा-Central government चा HAL सोबत करार; भारतीय हवाई दलाला मिळणार 12 नवीन सुखोई

“प्रत्येक पक्ष हा खातेवाटपावेळी काही खाती मागत असतो. ती आम्हीही मागितली. याची तडजोड संबंधित तिन्ही नेते एकत्र बसून करतील आणि ठरवतील. यासीठी आता केवळ एका दिवसाची वाट बघायची आवश्यकता आहे. एक दिवसानंतर ते ठरेल आणि एकदा ठरल्यानंतर आमच्यात कुठलाही वाद असणार नाही, अत्यंत मजबुतीने हे सरकार चालेल, एवढे मात्र निश्चित. खातेवाटपासंदर्भात घोळ असण्याचे काहीही कारण नाही. मला वाटते, या सर्वांचा निर्णय उद्या होऊन जाईल. हे सर्व आनंदाने आणि एकमेकांना समजून घेऊन होईल. सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकणार नाही.” असं शिरसाट म्हणाले. (Sanjay shirsat)

हेही वाचा-छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश

“शिंदे यांनी काल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. त्यात त्यांनी, आपल्याला महायुती म्हणून लढायचे आहे, महापालिका जिंकायची आहे, असे सर्वांना सांगितले आहे. हे कशासाठी आहे. हे याच साठी आहे की, आपल्याला महायुती म्हणून मजबुतीने मुंबई महापालिकाही काबीज करायची आहे. यामुळे नाराज असते, तर अशा बैठका त्यांनी घेतल्या असत्या का? अशा सूचना त्यांनी दिल्या असत्या का? कार्यकर्त्यांना कामाला लावलं असंत का? म्हणून या सर्व बातम्या आहेत. सूत्रांनुसार दिलेल्या बातम्या आहेत. शिंदे कधीही नाराज नाहीत आणि असले तर ते बोलल्याशिवाय राहणार नाही. हे सर्वांना माहीत आहे. शिंदे या सर्वांच्या फार पुढे आहेत. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.” असेही शिरसाट यावेळी म्हणाले. (Sanjay shirsat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.