Tata Motors कडून बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे आपल्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण

विविध उद्योगांसाठी आधुनिक जेनसेट्स, इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स आणि अॅक्‍सल्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीचे प्रदर्शन

38
Tata Motors कडून बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे आपल्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक आणि गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे प्रगत अॅग्रीगेट्सची सर्वसमावेशक श्रेणी दाखवली. यामध्‍ये २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंजमध्‍ये उपलब्‍ध असलेले सीपीसीबी IV+ प्रमाणित टाटा मोटर्स जेनसेट्स, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्सपर्यंतचे सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स, लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स व ट्रेलर अॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्सचा समावेश होता. मटेरिअल हाताळणी, बांधकाम उपकरण, औद्योगिक उपयोजन व लॉजिस्टिक्‍स विभागांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यात आले आहेत, तसेच उच्‍च कार्यक्षमता व टिकाऊपणासाठी निर्माण करण्‍यात आले आहेत.

(हेही वाचा – Allu Arjun Arrested : ‘पुष्पा 2’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक !)

बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २.०४ येथे टाटा मोटर्स पॅव्हिलियनचे उद्धाटन करत टाटा मोटर्स (Tata Motors) कमर्शियल वेईकल्‍सच्‍या स्‍पेअर्स अँड नॉन-वेईकुलर बिझनेसचे प्रमुख विक्रम अग्रवाल म्‍हणाले, “बाऊमा कॉनएक्‍स्‍पो शक्तिशाली व विश्‍वसनीय तंत्रज्ञानांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स सादर करण्‍याकरिता परिपूर्ण प्‍लॅटफॉर्म आहे. हे नवीन अॅग्रीगेट्स ग्राहकांचा प्रत्‍यक्ष आवाज आहेत, जे व्‍यापक ग्राहक अभिप्रायांनंतर विकसित करण्‍यात आले आहेत. आम्‍ही भारतातील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत, जेनसेट्ससह पॉवर सोल्‍यूशन्‍स वितरित करत आहोत, ज्‍यामुळे पाायाभूत सुविधा सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स व लाइव्‍ह अॅक्‍सल्‍ससह सक्षम होतील आणि लॉजिस्टिक्‍स ट्रेलर अॅक्‍सल्‍स व कम्‍पोनण्‍ट्ससह प्रबळ होईल.”

(हेही वाचा – UP, राजस्थान, हरियाणातून दिल्लीला येणाऱ्या बसेसवर बंदी; Supreme Court चे आदेश, कारण काय ?)

टाटा मोटर्स (Tata Motors) अॅग्रीगेट्स त्‍यांचा उच्‍च टिकाऊपणा, कार्यक्षमता व परफॉर्मन्‍ससाठी ओळखले जातात. व्‍यापक संशोधनाच्‍या माध्‍यमातून विकसित आणि अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या या सोल्‍यूशन्‍सना देशभरातील २५००० हून अधिक अधिकृत सर्विस आऊटलेट्सचे पाठबळ आहे. कंपनी प्रखर औद्योगिक वैशिष्‍ट्यांची पूर्तता करणारे नाविन्‍यपूर्ण, उच्‍च-कार्यक्षम अॅग्रीगेट्स देत भारतातील पायाभूत सुविधा विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

(हेही वाचा – Central government चा HAL सोबत करार; भारतीय हवाई दलाला मिळणार 12 नवीन सुखोई)

बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स

  • टाटा मोटर्स जेनसेट्स : सीपीसीबी IV+ प्रमाणितसह रिमोट मॉनिटरिंग सिस्‍टम; २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंज.
  • इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स : सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्समध्‍ये उपलब्‍ध.
  • लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स : उच्‍च-टन क्षमतेच्‍या बांधकाम उपकरणासाठी प्रबळपणे डिझाइन करण्‍यात आले आहेत.
  • ट्रेलर अॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्स : हेवी-ड्युटी व्‍यावसायिक वाहनांसाठी नवीन १६ मिमी जाड ट्रेलर अॅक्‍सल बीम.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.