Counterfeit medicine: राज्यात औषध निरिक्षक नसल्याने बनावट औषधनिर्माते मोकाट

109
सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट औषधांच्या (Counterfeit medicine) विक्रीचा सुळसुळाट सुरू झालाय. त्यामुळे औषधे खरेदी करताना नागरिकांना सावधानता बाळगावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) केलंय. राज्यातून तसेच परराज्यातूनही बनावट औषधं विक्रीसाठी येत असल्याची माहिती समोर आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं (Food and Drug Administration) म्हटलं आहे. दरम्यान बनावट औषधे, गाेळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. औषध विभागाकडे नमूना घेण्यासाठी औषध निरीक्षक आणि घेतलले नमूना तपासायला शास्त्रज्ञ नसल्यानेच या बनावट कंपन्या मोकाट असल्याचे समोर आले आहे.  (Counterfeit medicine)
नमूना औषधांच्या (Sample drug) तपसणीसाठी कोणतेही अधिकारी नाहीत. त्यामुळे बनावट, गोळ्या औषधे कशी शोधणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या राज्यात सहायक आयुक्तांची ४२ तर औषध निरीक्षकांची तब्बल ११९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात ‘ॲझिथ्रोमायसीन ५००’ (Azithromycin 500) या बनावट गोळ्यांचा पुरवठा (Supply of counterfeit pills) झाल्याचे प्रकरण आठवड्यापूर्वी उघड झाले होते. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. या रुग्णालयात कोल्हापूरमधील मे. विशाल एन्टरप्रायजेसकडून गोळ्यांचा पुरवठा झाला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये अन्न प्रशासनाने या गोळ्यांचे नमूना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.

केवळ ८१ निरीक्षक कर्तव्यावर
फिल्डवर जाऊन काम करणारे पद म्हणजे औषध निरीक्षक (Drug Inspector) आहे. परंतु, राज्यातील २०० पैकी ८१ निरीक्षकच कर्तव्यावर आहेत. तब्बल ११९ पदे ही रिक्त आहेत. अनेक जिल्ह्यांत एकही निरीक्षक नाही. त्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. (Counterfeit medicine)
हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.