Sharad Pawar यांचा पक्ष फुटणार; Sanjay Raut यांचे संकेत

90
Sharad Pawar यांचा पक्ष फुटणार; Sanjay Raut यांचे संकेत
  • खास प्रतिनिधी 

राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गट फुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी १४ डिसेंबर २०२४ या दिवशी या वृत्ताला दुजोरा दिला आणि शरद पवार यांचे ५ खासदार फुटू शकतात, असे संकेत दिले.

मंत्रीपदासाठी कोटा

राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “माझी अशी माहिती आहे की, प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार यांना सांगितलं गेलं आहे की तुम्ही शरद पवार यांचे पाच खासदार फोडून घेऊन या. तेव्हा तुमचा सहा खासदारांचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार यांच्या पक्षाचे पवार यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी, जीवाचे रान करून, कष्टाने निवडून आणलेले खासदार आणि हे त्यांचे खासदार फोडत आहेत.”

सध्या अजित पवार यांचा लोकसभेत एकच खासदार आहे तर शरद पवार यांचे मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ८ खासदार निवडून आले.

(हेही वाचा – Vishva Hindu Parishad तर्फे १५ डिसेंबरला ‘शौर्य संचलना’चे आयोजन)

फुटणाऱ्याला लाज, शरम वाटली पाहिजे

“फुटणाऱ्याला लाज, शरम वाटली पाहिजे. कुणीही असतील. पवारांसारखा एक महान नेता महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेबांनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी फुटण्याचा विचार करत असतील तर ते पवार यांच्याशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी करत आहेत, असे मी समजतो,” असे राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.

मध्यस्थी आणि फोडण्याचा प्रयत्न

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मध्यस्थी करून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना राऊत (Sanjay Raut)  म्हणाले, “मध्यस्थी करण्याचा आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असेल. मी ओळखतो पवार यांना, त्यांची विचारधारा ही ‘आरएसएस’शी मेळ नाही खात. पवार एकटे राहतील, परत उभे राहून पक्ष वाढवतील पण भाजपासोबत जाणार नाहीत, असा मला विश्वास आहे,” असे राऊत म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.