मुंबईत निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करण्यात येत असून या कामांचे क्वालिटी ऑडिट करा तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करा, अशी मागणी करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.
(हेही वाचा – Sharad Pawar यांचा पक्ष फुटणार; Sanjay Raut यांचे संकेत)
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोड या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले होते. नव्याने बांधलेल्या रस्त्याला तडा गेल्या आहेत, सिमेंट निघून खडी बाहेर पडून रस्ता पुन्हा खराब झाल्याचे निदर्शनास आले होते. (Ashish Shelar)
(हेही वाचा – ‘मविआ’ची शकले; Sanjay Raut यांची कबुली, वडेट्टीवार म्हणाले राऊतांना फ्रस्ट्रेशन)
अशाच प्रकारे मुंबईत अन्य ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत आहेत का, कामांचे क्वालिटी ऑडिट करण्यात येते का याकडे लक्ष वेधीत आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. तसेच सांताक्रुझ येथील कामांची चौकशी करा अशी मागणी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community