- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे सध्या सुरु असून या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना नेमूनही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची बनत आहे. यापूर्वी बनवलेले अनेक रस्त्यांच्या भेगा पडलेल्या असून आता साक्षात भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही आपल्या विभागातील नव्याने बनवलेल्या रस्त्यावर भेगा पडल्याची बाब निदर्शनास आणल्याने यासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नक्की करता काय असा सवाल उपस्थित होत आहे. (CC Road)
मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्टया टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत करण्यात येत आहेत. सध्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरु असून या कामांसाठी प्रथम प्रकल्प व्यवस्थापन आणि संनियंत्रण संस्थेची नेमणूक केली आहे. परंतु या संस्थेची नेमणूक केल्यानंतरही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची बनल्याची निदर्शनास येत आहे. (CC Road)
(हेही वाचा – ‘राधे राधे’ बोलल्यामुळे मुस्लिम शिक्षक Habib Khanची विद्यार्थ्यांना मारहाण; शाळा प्रशासनानेही केले दुर्लक्ष)
आता या रस्त्याच्या कामांच्या तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी मुंबई) नेमणूक केली आहे. या येथील चमूने परिमंडळ ७ मध्ये आर उत्तर विभागअंतर्गत दहिसर येथे गुरुवार १२ डिसेंबर २०२४ मध्यरात्रीनंतर भेट दिली. सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या पेव्हमेंट क्लॉलिटी कॉंक्रिट (PQC) पद्धतीच्या आयआयटी मुंबईच्या चमूमार्फतच्या पाहणी प्रसंगी महानगरपालिका, रेडिमिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांटचे अभियंते, गुणवत्ता व्यवस्थापन आणि संनियंत्रण संस्थेचे अभियंते आदींना चमूने मार्गदर्शन केले. रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे आहे. आयआयटी मुंबईच्या चमूमध्ये प्रा. सोलोमॉन यांच्यासह चार सदस्यांचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, दुय्यंम अभियंता आदींची यावेळी उपस्थित होते. (CC Road)
सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने विविध निकषांची या चमूने पाहणी केली. सिमेंट कॉंक्रिटचे चौकोनी तुकडे (क्यूब), रेडिमिक्स कॉंक्रिटच्या पावत्या आणि बॅचचा अहवाल यावेळी तपासण्यात आले. तसेच काँक्रिटचे तापमान, स्लम्प चाचणी, फ्लेक्जूरल बीम सॅम्पल कास्टिंग आदी चाचण्याही यावेळी करण्यात आल्या. मध्यरात्री १२ वाजेपासून ते २ वाजेपर्यंत पार पडलेल्या पाहणी दोऱ्यात आयआयटी मुंबई चमूने महानगरपालिकेच्या अभियंत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रकल्पाच्या ठिकाणी येणाऱ्या विविध आव्हानात्मक विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या पुढील टप्प्यातील कामांमध्ये अधिक काळजी घेण्याच्या अनुषंगानेही आयआयटी चमूने सूचना दिल्या. सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (CC Road)
(हेही वाचा – महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास)
कॉंक्रिटीकरण सुरू असताना घ्यावयाच्या चाचण्या व प्रत्यक्ष हवामानातील बदल आणि तापमानानुसार प्रत्यक्षस्थळी करावयाच्या उपाययोजना याबाबतची माहिती व सूचना आयआयटी चमूने यावेळी केल्या. कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, कॉंक्रिट ग्रुव्ह कटिंगची काटेकोर अंमलबजावणी ८ ते १२ तासांमध्ये करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच कॉंक्रिटीकरण चालू असताना हवेतील आर्द्रता व वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल एपचा सुयोग्य वापराबाबत चमूने यावेळी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. कॉंक्रिटच्या क्यूरींग पद्धतीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणानंतर पृष्ठभागावरील ब्रूमिंग कशाप्रकारे करावे, याचेही प्रात्यक्षिक चमुमार्फत उपस्थित कुशल कामगारांना यावेळी देण्यात आले. (CC Road)
रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्पस्थळाला भेटी देणे इत्यादींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाच्या बाबतीत करण्यात आला आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community