
प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi ) यांनी संसदेतील त्यांच्या पहिल्या भाषणात हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादकांच्या समस्या मांडल्या, परंतु त्यांच्या वक्तव्याने नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भाजपा प्रवक्ते शहजाग पूनावाला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या एका भागात प्रियंका गांधी म्हणतात, आज हिमाचलमध्ये जे काही कायदे बनवले गेले आहेत, ते सर्व मोठ्या उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत. त्यामुळे हिमाचलमधील छोटे सफरचंद उत्पादक शेतकरी रडत आहेत. तसेच एका व्यक्तीसाठी सर्व काही बदलले जात आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाला.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाविषयी बेगडी प्रेम; Pravin Darekar यांचे खडेबोल)
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांचे हे विधान हिमाचलमधील काँग्रेस सरकारकडे बोट दाखवत आहे, जिथे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत आहे. याबाबत सत्ताधारी पक्ष भाजपाने त्यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही.
प्रियंकाच्या विधानाचा समाचार घेत भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, कृपया विशेषाधिकारप्राप्त काँग्रेसींना आठवण करून द्या की हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. राहुल गांधींनी काँग्रेसला ९० निवडणुका हरायला भाग पाडले. आता प्रियंका गांधी त्यांचा विक्रम मोडतील, असे पूनावाला म्हणाले. त्यांचे हे विधान इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहे. हिमाचलमधील सफरचंद उत्पादकांना त्यांच्या पिकाच्या वाजवी किंमत आणि धोरणांबद्दल दीर्घकाळापासून चिंता आहे. पण प्रियांका गांधींच्या (Priyanka Gandhi ) या विधानाने, ज्यात त्यांनी हिमाचलमधील कायदा उद्योगपतींच्या बाजूने असल्याचे सांगितले. तो एकाअर्थी हिमाचल सरकारवरच प्रश्न उपस्थित करतो.
‘बोलणे’ आणि ‘कृती करणे’ यात फरक
भाजपाने हे काँग्रेसच्या (congress) ‘बोलण्यातील आणि कृती’मधील अंतराचे उदाहरण असल्याची टीका केली. त्याचवेळी प्रियंका गांधींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हिमाचलच्या काँग्रेस सरकारवर आता सफरचंद उत्पादकांच्या समस्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव टाकला जाईल. प्रियंका (Priyanka Gandhi ) यांचे संसदेतील हे पहिलेच भाषण होते, मात्र त्यांच्या या विधानाने त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community