Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

107
Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!
Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. खरंतर, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी अलीकडेच ती याचिका फेटाळली होती. (Supreme Court)

(हेही वाचा- Priyanka Gandhi यांच्या विधानाने हिमाचलमधील काँग्रेस सरकारच्या अडचणीत वाढ; म्हणाल्या, हिमाचलमधील कायदे उद्योगपतींसाठी)

ज्यात काँग्रेसने २०२२ मध्ये भाजपामध्ये सामील झालेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. याचिका फेटाळताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले होते की, जर एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार पक्षाशी असहमत असतील तर त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. (Supreme Court)

या निर्णयाला आव्हान देत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यास सांगितले. (Supreme Court)

(हेही वाचा- Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीचे महत्त्व, दत्त जन्माचा इतिहास जाणून घ्या)

आमदार दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, संकल्प आमोणकर, मायकेल लोबो, डेलीला लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस आणि राजेश फळदेसाई यांच्याविरोधात गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष चोडणकर यांनी या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. (Supreme Court)

हेही पाहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.