दिल्लीतील अनेक शाळांमध्ये (Delhi schools) सात दिवसांत तिसऱ्यांदा बॉम्ब (Delhi Bomb Threat) ठेवण्याच्या धमक्या आल्या आहेत. तपासासाठी पोलिसांचे पथक डीपीएस आरके पुरम येथे पोहोचले आहे. सकाळी सहा वाजता धमकीचा मेल आला. दरम्यान, कालच्या (१३ डिसेंबर) धमकीनंतर आज (१४ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी धमकीचा मेल आल्याने पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. दिल्लीतील शाळांमध्ये धमक्यांची दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. (Delhi Bomb Threat)
हेही वाचा- MSRTC : ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर एसटी महामंडळ करणार मोठी कारवाई; वाचा संपूर्ण प्रकरण
श्रीनिवासपुरीच्या केंब्रिज शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी गोस्वामी यांनी सांगितले की, सकाळी 5:50 वाजता धमकी देणारा ई-मेल पाहिल्यावर त्यांनी पोलिस, पालक आणि स्कूल बस चालकांना याची माहिती दिली. (Delhi Bomb Threat)
हेही वाचा-Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे १५ ते २० मिनिटे उशीराने
13 डिसेंबर रोजी भटनागर इंटरनॅशनल स्कूल, पश्चिम विहार येथे, सकाळी 4:21 वाजता, केंब्रिज स्कूल, श्री निवास पुरी येथे, सकाळी 6:23 वाजता, डीपीएस अमर कॉलनी येथे, सकाळी 6:35 वाजता, दक्षिण दिल्ली पब्लिक स्कूल, डिफेन्स येथे कॉलनी, सकाळी 7:00 वाजता: सफदरजंग येथील दिल्ली पोलिस पब्लिक स्कूलमध्ये सकाळी 8:02 वाजता आणि रोहिणीतील व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलमध्ये सकाळी 8:30 वाजता 57 कॉल आले. त्यानंतर पथक तपासासाठी पोहोचले पण काहीही संशयास्पद आढळले नाही. (Delhi Bomb Threat)
इसी हफ़्ते में दूसरी बार दिल्ली के स्कूलों को बम की धमकी मिली है, जो बेहद गंभीर और चिंताजनक है। अगर ऐसा ही चलता रहा तो बच्चों पर कितना बुरा असर पड़ेगा? उनकी पढ़ाई का क्या होगा? https://t.co/gKiCqdew5L
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 13, 2024
9 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील 40 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. यामध्ये मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूल यांचा समावेश होता. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. मेल पाठवणाऱ्याने बॉम्बचा स्फोट न करण्याच्या बदल्यात 30 हजार अमेरिकन डॉलर्स मागितले होते. यानंतर पोलिस, श्वानपथक, शोध पथक आणि अग्निशमन दलाची पथके तेथे रवाना झाली. मात्र, झडतीमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. (Delhi Bomb Threat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community