Pratik Lonare : रोम विद्यापीठाकडून नाशिकच्या प्रतीक लोणारे यांना खगोलशास्त्रात पीएचडी प्रदान

296
Pratik Lonare : रोम विद्यापीठाकडून नाशिकच्या प्रतीक लोणारे यांना खगोलशास्त्रात पीएचडी प्रदान
Pratik Lonare : रोम विद्यापीठाकडून नाशिकच्या प्रतीक लोणारे यांना खगोलशास्त्रात पीएचडी प्रदान

नाशिकच्या एच. पी. टी / आर. वाय. के महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतीक दत्तात्रेय लोणारे (Pratik Lonare) यांना खगोलशास्त्र या विषयात पीएच. डी. प्रदान केल्याचे इटली मधील रोम विद्यापीठाने (University of Rome) नुकतेच जाहीर केले आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय Multi-band Photometric Studies of Extragalactic Globular Cluster Systems in Galaxy Groups and Clusters: Getting Ready for the LSST and Euclid Data Releases असा होता आणि त्यांना डॉ. मिखेले कॅन्टिएलो यांचे मार्गदर्शन लाभले. लोणारे (Pratik Lonare) यांना नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, इटली या संस्थेची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.

हेही वाचा-Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस ‘रामगिरीत’ तर अजित पवार यांना ‘विजयगड’ एकनाथ शिंदेचा बंगला कोणता?

आर. वाय. के महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात बी. एस्सी. पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केल्यानंतर त्यांनी (Pratik Lonare) एम. एस्सी. साठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांची रोम विद्यापीठात खगोलशास्त्र विषयात संशोधन करण्यासाठी निवड झाली. दक्षिण अमेरिकेतील चिली या देशात असलेली Very Large Telescope नावाची जगप्रसिद्ध दुर्बीण तसेच अंतराळात भ्रमण करत असलेले युक्लिड नावाचे यान यांच्याद्वारे मिळालेली विदा (data) वापरून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. “ आर. वाय. के महाविद्यालयात शिकत असताना डॉ. गिरीश पिंपळे सर आम्हांला खगोलशास्त्र शिकवायचे. त्यांच्यामुळे मला या विषयाची अतिशय आवड निर्माण झाली. ते माझ्यासाठी दिशादर्शक आहेत.” असे प्रतीकने सांगितले. (Pratik Lonare)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.