Rajkot fort वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता प्रसिद्ध शिल्पकार Ram Sutar यांच्या कंपनीकडे

93
Rajkot fort वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता प्रसिद्ध शिल्पकार Ram Sutar यांच्या कंपनीकडे
Rajkot fort वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता प्रसिद्ध शिल्पकार Ram Sutar यांच्या कंपनीकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता. या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आता चार महिन्यानंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार (Anil Sutar) यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. (Rajkot fort)

हेही वाचा-Delhi Bomb Threat : दिल्लीच्या शाळांना सलग दुसऱ्या दिवशी धमकीचा मेल; पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी निविदा दाखल केली होती. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. (Rajkot fort)

हेही वाचा-MSRTC : ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर एसटी महामंडळ करणार मोठी कारवाई; वाचा संपूर्ण प्रकरण

गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने २०.९० कोटींची तर राम सुतार यांच्या कंपनीने ३६.०५ कोटींची निविदा दाखल केली. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निविदेच्या अटींनुसार राम सुतार यांच्या कंपनीने इतर कंपन्यांपेक्षा अधिक दराने बोली लावली होती. पण नंतर वाटाघाटीमध्ये एल १ किंमतीशी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली आणि म्हणूनच त्यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. (Rajkot fort)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.