एक अष्टपैलू व्यक्तिमत्व; Manohar Parrikar यांच्या आठवणींना उजाळा

72
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व; Manohar Parrikar यांच्या आठवणींना उजाळा
  • प्रतिनिधी

दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या प्रामाणिक आणि आदर्श कार्यशैलीमुळे, कार्यप्रणालीमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा आदर प्राप्त झाला होता, असे मत लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना व्यक्त केले. फिन्स संस्थेतर्फे दिवंगत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांचे व्याख्यान दिल्ली मधील कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांच्या पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे, अॅड. बाळासाहेब देसाई, उत्पल पर्रीकर आणि फिन्स संस्थेचे प्रभाकर परांजपे उपस्थित होते.

(हेही वाचा – दादरमधील हनुमान मंदिर पाडले जाणार नाही; भाजपा नेते Kirit Somaiya यांची ग्वाही)

तर एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले की, दूरदर्शी आणि द्रष्टे नेतृत्व अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गोव्यातील राजकीय अस्थिरतेला पर्रीकरांच्या समर्थ, व्यावहारिक नेतृत्वामुळे स्थैर्य लाभले. सामाजिक सुरक्षा योजनेची सुरुवात पर्रीकरांनी. पूल, महामार्ग, राजधानीत व इतरत्रही मोठे प्रकल्प उभारले. प्रशासनाचे कार्य नागरिक केंद्रित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सुधारणा केल्या असल्याचेही ते म्हणाले. लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे म्हणाले की, मनोहर पर्रीकर हे भारताच्या विलक्षण राजकारणी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, ज्यांनी गोव्याचा मुख्यमंत्री आणि भारताचा संरक्षण मंत्री म्हणून सेवा केली. साधेपणासाठी, प्रामाणिकपणासाठी आणि समर्पणासाठी परिचित असलेल्या पर्रीकरांनी (Manohar Parrikar) भारतीय राजकारण आणि शासनावर आपल्या कार्याने अवीट ठसा ठेवला.

(हेही वाचा – Rajkot fort वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम आता प्रसिद्ध शिल्पकार Ram Sutar यांच्या कंपनीकडे)

तर आभार व्यक्त करताना देसाई यांनी पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. ते म्हणाले की १९७८ मध्ये त्यांनी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) धातुशास्त्र अभियांत्रिकीत पदवी मिळवली. संपूर्ण भारतात मुख्यमंत्री बनलेले पर्रीकर पहिले आयआयटीयन होते. जडणघडणीच्या काळात त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. शालेय वयातच ते संघाचे सदस्य झाले होते. RSSची मूल्ये आणि शिस्तीच्या मुशीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला. दूरदर्शी आणि द्रष्टे नेतृत्व अशी त्यांनी काळात स्वतःची ओळख निर्माण केली. पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.