वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या Rahul Gandhi यांचा आवाज इंदिरा गांधींचे पत्र दाखवून केला बंद; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या भाषणानंतर लोकसभेत बाके वाजली 

डॉ. शिंदे यांनी माजी पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी 1980 मध्ये लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला, ज्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना "भारताचे असामान्य सुपुत्र" म्हणून गौरवले होते आणि त्यांची जयंती साजरी करण्याच्या योजनेचे समर्थन केले होते.

223

संसदेत सध्या संविधानावर सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेताना विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत त्यांच्याविषयी अपमानास्पद आणि वादग्रस्त टिप्पणी केली. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा भारतीय राज्यघटनेला विरोध होता, असे धादांत खोटे विधान केले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पत्राची आठवण करून दिली. त्या पत्रात स्वतः इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे म्हटले होते. डॉ. शिंदे यांच्या उत्तराने राहुल गांधी यांचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसले. तसेच सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून डॉ. शिंदे यांच्या भाषणाचे कौतुक केले.

काय म्हणाले राहुल गांधी? 

भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. मनुस्मृती हा असा धर्मग्रंथ आहे जो आपल्या हिंदू राष्ट्रासाठी वेदांनंतर सर्वात जास्त पूज्य आहे आणि ज्यातून आपला प्राचीन काळ आपल्या संस्कृती, चालीरीती, विचार आणि आचरणाचा आधार बनला आहे. या पुस्तकाने, शतकानुशतके, आपल्या राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि दैवी वाटचालीचे संहिताबद्ध केले आहे. आज मनुस्मृति हा कायदा आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, भाजपाचे नेते वीर सावरकर यांनी म्हटले होते. तुम्ही तुमच्या नेत्याने लिहिलेले मान्य करता का, हे तुमच्या नेत्याने म्हटले होते.

(हेही वाचा Sambhal मध्ये तपासात सापडले शिवमंदिर, १९७८ पासून बंद असणारे मंदिर अखेर उघडले)

काय म्हणाले डॉ. श्रीकांत शिंदे? 

यानंतर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हल्लाबोल केला. राहुल गांधी हे सतत राष्ट्रीय चिन्हाचा अनादर करत असतात. राहुल गांधींचे वक्तव्य बिनबुडाचे असून राहुल यांनी सावरकरांच्या जीवनाचा आणि त्यागाचा अभ्यास केला आहे का, असा सवाल केला. राहुल गांधी यांच्या भूमिकेतील ढोंगीपणा अधोरेखित करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी माजी पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी 1980 मध्ये लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला, ज्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भारताचे असामान्य सुपुत्र” म्हणून गौरवले होते आणि त्यांची जयंती साजरी करण्याच्या योजनेचे समर्थन केले होते.

इंदिरा गांधींच्या पत्राचा हवाला देत शिंदे म्हणाले, “भारताच्या या महान सुपुत्राच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा उत्सव यशस्वी व्हावा अशी माझी इच्छा आहे, असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. जर इंदिरा गांधी या स्वतः काँग्रेस नेत्या होत्या, त्या जर वीर सावरकरांचे योगदान ओळखू शकत असतील, तर मग राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वारंवार वीर सावरकर यांच्यावर करत असलेली टीका हे राजकारण आहे. वीर सावरकरांचा तुरुंगवास आणि स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान अतुलनीय असल्याकडेही डॉ. शिंदे यांनी म्हटले. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे केवळ वीर सावरकरांचाच अपमान नाही तर देशभक्ती आणि बलिदानाच्या मूल्यांचाही अपमान करणारे आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.