दादरमधील मंदिरप्रकरणी Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही…

91
दादरमधील मंदिरप्रकरणी Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही...
दादरमधील मंदिरप्रकरणी Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही...

शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर (Dadar) येथील हनुमानाच्या मंदिरासंदर्भात रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटीसीवरून महायुती सरकारवर पत्रकार परिषदेत टीका केली. त्यावेळी बोलण्याच्या ओघात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दादर येथील मंदिर कोणाचे आहे हेच लक्षात राहिले नाही. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले की, मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला..! संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला आहे, अजून किती माती करून घेणार उद्धवजी, असा सवालही भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विचारला आहे.

( हेही वाचा : मनुस्मृती म्हणते बलात्काऱ्यांना सोडा; Rahul Gandhi यांच्याकडून मनुस्मृतीचा अवमान 

दरम्यान दादरच्या ८० वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने प्रशासनाने दिलेल्या नोटीसाला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच दादरमधील हनुमान मंदिर हे पाडले जाणार नाही किंवा तोडले जाणार नाही अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला तसं पत्र देखील पाठवलं आहे. तसेच “दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आहे.  अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही”, असं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले आहेत.(Chitra Wagh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.