रेल्वेने दादरचे ८० वर्ष जुने हनुमानाचे मंदिर (Dadar Hanuman Mandir ) पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा : Dadar Hawkers : दादर पश्चिममध्ये तिसऱ्याच दिवशी कारवाई फसली; महापालिकाच करते जनतेची दिशाभूल)
दरम्यान हनुमान मंदिरात (Dadar Hanuman Mandir ) नित्यपुजा आणि आरती सुरुच राहणार असल्याचे ही मंगल प्रभात लोढा म्हणाले. मात्र स्थिगीतीनंतरही शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मंदिराला भेट देत महाआरती केली. त्याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही मंदिराला भेट देऊन रेल्वे प्रशासनाशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.
लोढा याप्रकरणी म्हणाले की, विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. आम्ही जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. त्याआधी आमचं मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते. तसेच नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली आहे. मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही. या ठिकाणी स्टे मिळाल्यानंतर कशाला कोणी आरती केली पाहिजे? धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. मंदिराला (Dadar Hanuman Mandir ) काहीही होणार नाही, मंदिर (Dadar Hanuman Mandir) आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही. सर्व मंदिर वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या ठिकाणी आहे. निर्णयाची स्टे ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे, असेही लोढा यांनी म्हटले.
हेही पाहा :