- प्रतिनिधी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सलग दोन दिवस दोन्ही सभागृहांमध्ये विशेष चर्चासत्र सुरू आहे. या चर्चेदरम्यान, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या निर्णयावर जोरदार टीका केली.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, आपल्या खेदाने हे नमूद करावे लागत आहे की, संविधान निर्मात्यांच्या मनात एकता होती. पण स्वातंत्र्यानंतर विकृत मानसिकता किंवा स्वार्थामुळे देशातील एकतेवर प्रहार करण्यात आला. काँग्रेसने मनमानी कारभार केला. आणीबाणी लादली असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केला.
मात्र, गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी, विविधतेत विरोधाभास शोधणे सुरु ठेवले. विविधेतील एकतेत विष पेरण्याचं काम करत काँग्रेसकडून देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात म्हटले.
(हेही वाचा – SPC : ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमाला मुंबईत चांगला प्रतिसाद)
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० गंभीर आरोप
१ – आणीबाणी हे काँग्रेसचे पाप.
२ – काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला.
३ – पंडित नेहरूंनी संविधान बदलले पाहिजे असे म्हटले होते, पत्राचा दाखला.
४ – ५५ वर्षे एका कुटुंबाने देशावर राज्य केले.
५ – इंदिरा गांधींकडून सत्तेचा गैरवापर, पहिल्यांदा कुनीती वापरली.
६ – कट्टर पंथियांना समर्थन देत राजीव गांधींनीही संविधानाला धक्का देण्याचे काम केले.
७ – काँग्रेसने न्यायालयाचे पंख छाटण्याचे काम केले.
८ – काँग्रेसच्या कुनीतीची परंपरा आजही कायम आहे.
९ – आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आले होते.
१० – काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. गेल्या ६० वर्षांत ७५ वेळा संविधान बदलण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community