जेव्हा आपल्या प्रियजनांवर अत्याचार होतो, तेव्हा कसे वाटते, हे आम्हाला ठाऊक आहे. गुन्हेगारांकडून मुली आणि मुले यांची हत्या करणे काय आहे, हे आम्ही अनुभवले आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार असतांना हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत आणि हे वास्तव आंतरराष्ट्रीय समुदायापासूनही लपून राहिलेले नाही. तिथे जे काही चालले आहे, ते अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी (Kobbi Shoshani) यांनी टीका केली आहे. (Hindus In Bangladesh)
(हेही वाचा – Rani Baug : मुंबईत राणीबागेत वनस्पतीय शास्त्रीय उद्यान : किती प्रजातींची झाडे आहेत तिथे, जाणून घ्या)
ते येथे आयोजित ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०२४’ (World Hindu Economic Forum 2024) मध्ये बोलत होते. इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याबद्दल शोशनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांचे आभार व्यक्त केले.
कोबी शोशनी म्हणाले की, इस्रायल आणि भारत या दोघांमध्ये सुरक्षा आणि आतंकवाद यासंबंधीच्या आव्हानांमध्ये साम्य आहे. आमची कौटुंबिक मूल्ये, परंपरा, चालीरीती, सामाजिक रचना आणि आतंकवाद यांविरुद्धची आमची लढाई यामुळे आमचे भारतावर प्रेम आहे. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी आमच्यासोबत जे घडले ते आम्ही कधीही विसरणार नाही. आर्थिक स्थैर्यासाठी लष्करी ताकद आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. (Hindus In Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community