MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांना संशय

97
MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांचा संशय
MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांचा संशय

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (National Investigation Agency) आणि आतंकवादविरोधी पथक यांना उत्तरप्रदेशातील झाशी आणि कानपूर येथे रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागच्या कटामागे मदरशांचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. इस्लामी कट्टरतावादी आणि आतंकवादी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर करून घेत आहेत. त्यांचा मदरशांशीही संबंध आहे. हे शोधण्यासाठी या यंत्रणा अनेक ठिकाणी धाडी टाकत आहेत. तसेच यामागील विदेशी निधीचे स्रोतही शोधले जात आहेत. (MADARSAS Rail Jihad)

(हेही वाचा – Truck Accident: जालना येथे ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जण जागीच ठार, 24 जखमी)

अन्वेषण यंत्रणा करत आहेत तपास

याच पार्श्‍वभूमीवर २ दिवसांपूर्वी झाशी येथे धाड टाकून मदरसा शिक्षक मुफ्ती खालिद नदवी याची १८ घंटे चौकशी करण्यात आली. या वेळी स्थानिक मुसलमानांनी विशेषतः महिलांनी नदवी याची यंत्रणांच्या अधिकार्‍यांच्या कह्यातून सुटका केली होती; मात्र नंतर त्याला पुन्हा पकडण्यात आले. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.

गेल्या ३ मासांमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि कानलिडी एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्या झाशी आणि कानपूर यांच्या आसपास रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘वन्दे भारत’ या गाडीवर येथे दगडफेक करण्यात आली. ऑनलाईन माध्यमातून धार्मिक शिक्षण देणार्‍या अनेक लोकांचे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात अनुयायांना रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यासाठी चिथावण्यात आले आहे. अन्वेषण यंत्रणा आता अशा लोकांचा शोध घेत आहेत. (MADARSAS Rail Jihad)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.