One nation, One election विधेयक सोमवारी लोकसभेत मांडणार

102
केंद्रीय मंत्रिमंडळानं १२ डिसेंबरला ‘एक देश एक निवडणूक’ (One nation, One election) पद्धत देशात लागू करण्याच्या विधेयकांना मंजुरी दिली आणि सध्याच्या हिवाळी अधिवेशनात त्याचा मसुदा संसदेत सादर केला जाणार आहे. दरम्यान, १२९वी घटनादुरुस्ती विधेयक (129th Constitutional Amendment Bill), केंद्रशासित प्रदेश कायदेविषयक दुरुस्ती विधेयक ही दोन विधेयके केंद्रीय विधिमंत्री अर्जुन मेघवाल (Union Law Minister Arjun Meghwal) सोमवार, १६ डिसेंबरला लोकसभेत मांडणार आहेत.  (One nation, One election)

(हेही वाचा – Truck Accident: जालना येथे ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जण जागीच ठार, 24 जखमी)



केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. ते सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. एक देश, एक निवडणूक यासाठी दोन सुधारणा विधेयके आणली जातील. यापैकी एक विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी तर दुसरे विधेयक दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पाँडीचेरी विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच या विधेयकाला मंजुरी दिली असून २०३४ नंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्यघटनेत बदल केले जातील, ज्यामध्ये कलम ८३, १७२ आणि ३२७ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश (Union Territories) आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पुनर्रचना कायद्यातही बदल करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांना संशय)

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितरीत्या घेण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. मात्र या विषयासंदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने लोकसभा, विधानसभेबरोबर पालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही एकत्रितरीत्या घेतल्या जाव्यात, अशी शिफारस केली होती. मात्र ग्रामपंचायत, पालिका यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय न घेण्याचे धोरण सध्या ठरविले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.