Cyber Crime: सोशल मीडियावरील जाहिरात पडली महागात; ७१ लाखांचा गंडा; आरोपीला गोव्यातून अटक

114
Hacking : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कोर्टरूमची संगणक प्रणाली हॅक 
राज्यात मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत (Cyber ​​crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad Cyber ​​crime) येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून संगणक अभियंत्याला ७१ लाख रुपयांचा गंडा (Pimpri-Chinchwad fraud of Rs 71 lakh) घालण्यात आला आहे. हो, त्याला कारण ही तसच आहे. सोशल मीडिया हे जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, एक्स या ऍपवर आपण दिवसभर ऍक्टिव्ह असतो. पण हेच सोशल मीडियाचे (Social Media Fraud) प्लॅटफॉर्म आपल्याला महागात ही पडू शकतात. अशातच पिंपरी-चिंचवडमधील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. (Cyber Crime)
अगदी लहान वयातील मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत सर्वच जण सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. सध्या जाहिरातीचा जमाना सुरू असून, यामध्ये मोठ्या प्रमाणांवर जाहीराती येत असतात. याच घटनेत पिंपरी-चिंचवड येथील संगणक अभियंत्यानी इन्स्टाग्रामवर (Instagram fraud) आलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना शेअर मार्केटच्या ग्रुपमध्ये ऍड करून चांगले रिटर्न देण्याचं आमिष दाखवून तब्बल ७१ लाखांची फसवणूक केली. घटनेप्रकरणी सायबर पोलिसांनी गोवा राज्यातून रशियन आरोपीला अटक केली आहे. आरोपी टोनीच्या (Accused Tony) माध्यमातून सर्व सूत्र पुण्यात राहणारा आरोपी श्रेयस संजय माने (Accused Shreyas Sanjay Mane) बघायचा त्याला देखील पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.

(हेही वाचा – राज्यात वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी किती खर्च केला ?; Bombay High Court ने मागवला तपशील)
   
घटनेप्रकरणी संगणक अभियंता असलेले तक्रादार यांनी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसात धाव घेतली. तक्रार नोंदवण्यात आली. सायबरचे पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या टीमने तपास करण्यास सुरुवात केली. ज्या बँक खात्यात पैसे गेले ते बँक खाते गोवा राज्यात वापरलं असल्याचं तपासात पुढे आलं. सायबर पोलिसांची टीम गोवा येथे गेली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रशियन आरोपी टोनीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी श्रेयसला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. श्रेयस हा मित्रांकडून गेमिंगच्या नावाने बँक खाते आणि मोबाईल लिंक घेऊन तो विमानाने गोव्याला जायचा. तिथं टोनीसोबत संपर्क साधून त्याच्याकडून सायबर गुन्हे करवून घेत असल्याचे समोर आलं आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.