Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान 

176
Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान 
Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान 

राहुल गांधी यांचे आजोबा इटालियन आहेत. त्यामुळे इटालियन फॅसिस्ट प्रोपोगंडा ही एक व्यवस्था होती. त्यात खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे केले जाते. म्हणूनच कुठलाही पुरावा नसताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Veer Savarkar ) आरोप केले. त्यासाठी त्यांनी संसदेच्या व्यासपीठाचा गैरवापर केला. मात्र हीच विधानं त्यांनी संसदेबाहेर येऊन करून दाखवावीत, आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, असे थेट आव्हान स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar ) यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींना दिला. लोकसभेत संविधानावरील चर्चेत सहभाग घेताना राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी (Veer Savarkar ) धादांत खोटी विधाने केली. त्याचा खुलासा करण्यासाठी रविवार, १५ डिसेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) उपस्थित होते.

( हेही वाचा : Bangladesh मध्ये हिंदू मंदिरांतील मूर्त्यांची धर्मांधांकडून तोडफोड; हिंदूंचा आक्रमक पवित्रा

मनुस्मृतीविषयी काय म्हणालेले वीर सावरकर? 

पुढे रणजित सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लोकसभेत वाचून दाखवलेला कागद कुठल्या गटारातून त्यांना मिळाला याची मला कल्पना नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, सावरकर म्हणाले होते, मनुस्मृती हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. मनुस्मृतीकडे धार्मिक ग्रंथ म्हणून त्याकडे पाहावे. त्यामुळे आजच्या काळात आम्ही काय करावे, हे सांगण्याचा अधिकार मनुस्मृती, कुराण, बायबल अशा कुठल्याही धर्मग्रंथांना नाही, असे वीर सावरकरांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे. त्यामुळे भारतीय संविधानात काहीही भारतीय नाही  असे वीर सावरकरांनी सांगत त्यांनी मनुस्मृतीला कायदा मानला होता, असे राहुल गांधी यांनी केलेली विधाने धादांत खोटी असल्याचे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी स्पष्टपणे सांगितले.  (Veer Savarkar )

संविधान बनवताना वीर सावरकरांच्या ‘त्या’ पुस्तकाचा घेतलेला आधार 

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४५ साली भारतीय संविधान कसे असावे, यासाठी समिती नेमून Constitution of The Hindustan Free State असे पुस्तक लिहिले होते. त्यामध्ये सावरकर म्हणतात की, धर्म हा व्यक्तीच्या घरात पाळला जाईल. तसेच बाहेर आल्यावर सर्व धर्मांसाठी समान अधिकार असतील, असे सावरकर त्या पुस्तकात म्हणाले आहेत. याच पुस्तकाचा आधार भारतीय संविधानाच्या निर्मितीवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता, असेही रणजित सावरकरांनी (Ranjit Savarkar) स्पष्ट केले.

बॅरिस्टर गांधींचे विचारच संविधानविरोधी   

तसेच वीर सावरकर (Veer Savarkar ) संविधानविरोधी होते, असा खोटा प्रचार काँग्रेसींकडून केला जातो. परंतु बॅरिस्टर गांधी यांनी वर्णव्यस्था तुम्हाला शिक्षणाला बंदी करू शकत नाही. मात्र त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही, असे गांधी यांनी लिहून ठेवले होते. ज्याचा अर्थ वर्णव्यवस्थेच्या जोखडात अडकून पडण्याचा गांधींचा सल्ला आहे. तसेच बॅरिस्टर गांधींच्या विचाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमानवी म्हटले होते, असा उल्लेखही रणजित सावरकरांनी केला. त्यामुळे संविधानाच्या विरोधात मोहनदास करमचंद गांधी होते, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

नेहरू ब्रिटिशांचे एजंट होते 

नेहरूंनी अनेकदा संविधानाची पायमल्ली केली आहे. १० मे १९४७ ला व्हाईसरॉय लॉर्ड माउंट बॅटन (Louis Mountbatten) पत्नीसह नेहरूंना घेऊन शिमल्याला गेले. तिथे माउंटबेटन यांनी नेहरूंना फाळणीची योजना सांगितली. मात्र नेहरूंनी चिडून माउंट बॅटनचा फाळणीची प्रस्ताव फाडून फेकून टाकला. पंरतु एका दिवसानंतर असे काय घडले की, नेहरूंनी सुधारित प्रस्ताव मान्य केला. माउंट बॅटनच्या योजनेनुसार जून १९४८ मध्ये भारताची फाळणी व्हावी, असा प्रस्ताव होता. मात्र नेहरूंनी त्याला विरोध करून फाळणीच्या वेळी होणाऱ्या रक्तपाताची जबाबदारी ब्रिटीशांनी न घेता भारतीयांनी घ्यावी, त्यासाठी मुस्लिम लीगला वाटेल ते द्यायला नेहरू तयार झाले. त्यामुळे नेहरूंना ब्रिटीशांचे एजंट म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, अशी टीकाही रणजित सावरकरांनी (Ranjit Savarkar) केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.