Cabinet Expansion Maharashtra : महायुतीच्या ३३ आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

146
Cabinet Expansion Maharashtra : महायुतीच्या ३३ आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
Cabinet Expansion Maharashtra : महायुतीच्या ३३ आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion Maharashtra) दि. १५ डिसेंबर रोजी नागपुर येथे विस्तार झाला. त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल विधानसभा मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर नितेश राणे यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.

दरम्यान भाजपाचे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan)
यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ‘गिरीश भाऊ आगे बढो’ अशी घोषणाबाजी प्रेक्षकांमधून करण्यात आली. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तसेच ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बेलापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

तसेच मंत्रिपदाच्या शपथविधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळील मानले जाणारे दादा भुसे (Dadaji Bhuse)
यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परळी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. धनंजय मुंडेंसह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे विधानसभेत मुंडे बंधू-भगिनींचा आवाज घुमणार असल्याची चर्चा आहे.  दरम्यान मुंबईतून वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. लोढा यांनी आधीही मंत्रिपद भूषवले असून त्यांनी संस्कृत भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनेकडून उदय सामंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार, पालकमंत्री ते उद्योगमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे.

दरम्यान भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी ही महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव करणाऱ्या अतुल सावे (Atul Save) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर राळेगाव मतदारसंघातून भाजपाचे आमदार असलेले अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी माणिकराव कोकाटे आणि पंकज मुंडे यांच्या शपथविधीवेळी सर्वाधिक घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष असा प्रवास राहिलेल्या नरहरी झिरवळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राधानगरी विधानसभेचे प्रकाश आबिटकर मंत्रिपदाची शपथ घेत असताना ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी समर्थकांनी केली.

भाजपाच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

चंद्रशेखर बावनकुळे
मंगल प्रभात लोढा
चंद्रकात पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
गणेश नाईक
पंकजा मुंडे
आशिष शेलार
अशोक उईके
अतुल सावे
जयकुमार रावल
शिवेंद्रसिंहराजे भोसले
जयकुमार गोरे
संजय सावकारे
नितेश राणे
आकाश फुंडकर

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवळ
मकरंद जाधव-पाटील
बाबासाहेब पाटील

शिवसेनेच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.