मध्य रेल्वेने (Central Railway) २०२४ मध्ये आतापर्यंत ५१.७३ दशलक्ष टन माल वाहतुकीची नोंद केली आहे. यामध्ये नोव्हेंबर-२०२४ महिन्यातील ६.७२ दशलक्ष टन मालवाहतुकीचा समावेश आहे.(Central Railway)
हेही वाचा-Atul Subhash suicide case प्रकरणी पत्नी, सासू आणि मेव्हण्याला अटक
मध्य रेल्वेने अन्नधान्य (Cereals) , साखर (Sugar), कंटेनर (Container) आणि पेट्रोलियम उत्पादने (Petroleum products) यासारख्या वस्तूंच्या लोडिंग क्षेत्रात कामगिरी सुधारली आहे. ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करता आले आहे. दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनीसोलापूरविभागातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत पाहणी केली. मध्य रेल्वेने खालील लोडिंगची नोंद केली आहे. (Central Railway)
हेही वाचा-Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !
नोव्हेंबर-२०२४ मध्ये ८४ रेक अन्नधान्याचे लोडिंग केले गेले, तर नोव्हेंबर-२०२३ मध्ये ३६ रेक होते. यामध्ये १३३.३ टक्क्यांची प्रभावी वाढ आहे. नोव्हेंबर-२०२३ मधील ३१ रेकच्या तुलनेत नोव्हेंबर-२०२४ मध्ये साखरेचे ३८ रेक लोड करण्यात आले. ज्यामध्ये २२.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर-२०२४ मध्ये कंटेनरच्या ७७१ रेकची लोडिंग नोव्हेंबर-२०२३ मधील ७१८ रेकच्या तुलनेत, ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. नोव्हेंबर-२०२४ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे १९४ रेक नोंदवले गेले. नोव्हेंबर-२०२३ मध्ये १८५ रेक होते. यामध्ये ४.७ टक्के ची वाढ झाली गेली.(Central Railway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community