CM Devendra Fadnavis यांचा दिग्गजांना धक्का!

197
CM Devendra Fadnavis यांचा दिग्गजांना धक्का!
CM Devendra Fadnavis यांचा दिग्गजांना धक्का!
  • सुजित महामुलकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंत्रीमंडळावर मागील शिंदे सरकारमधील काही दिग्गज मंत्र्यांना धक्का दिला आहे. भाजपासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील काही बड्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळात डच्चू देण्याटी आला आहे.

बारा दिग्गज बाहेर

भाजपाने ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, विजयकुमार गावित तर राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम आणि शिवसेने नेते तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दूल सत्तार यांना घरी बसवले आहे.

(हेही वाचा – Cyber Crime: सोशल मीडियावरील जाहिरात पडली महागात; ७१ लाखांचा गंडा; आरोपीला गोव्यातून अटक)

भाजपाकडून तक्रार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील मागील मंत्रिमंडळात तानाजी सावंत (आरोग्य), दीपक केसरकर (शाळेय शिक्षण) आणि अब्दूल सत्तार (कृषी) यांच्याविरोधात भाजपा आमदारांनी तक्रारी केल्याने यांनाफडणवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही, अशी चर्चा आहे.

सना मलिकही बाहेर

अजित पवार (Ajit Pawar) यांनीही महाविकास आघाडीत आणि शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ, वळसे पाटील आणि संजय बनसोडे यांना डच्चू दिला. तसेच चर्चेतील तरुण, अल्पसंख्यांक महिला आमदार सना मलिक यांना मंत्री पदापासून दूर ठेवले याचे कारण त्यांचे वडील नवाब मलिक आहेत, असे बोलले जात आहे. सना या वादग्रस्त माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या असून मुंबईतील अणुशक्ती नगर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. यापूर्वी मलिक हे या मतदार संघातून निवडून आले होते तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगर मतादार संघातून नशीब आजमावत होते मात्र समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी त्यांच्या पराभव केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.