Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी

122
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दि. १५ डिसेंबर रोजी झाला. यावेळी ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर ६ आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपाच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. अद्याप शिवसेनेच्या महिला आमदारांचा मंत्रिपदात समावेश झालेला नाही. (Maharashtra Cabinet Expansion)

( हेही वाचा : Ajit Pawar : शपथ घेणाऱ्या मंत्र्यांबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं विधान !

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या २००९ पासून २०१९ पर्यंत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होत्या. २०१९ ला परळी विधानसभा मतदारसंघातून पंकज मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर पंकज मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक अडथळे आले. त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यात पंकज मुंडे यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यात २०२३मध्ये महायुती सरकारमध्ये आणि २०१९ ते २०२२ पर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री पदावर राहिलेल्या आहेत. २०१९ ला त्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. तसेच २०२०-२०२२ मध्ये त्यांनी रायगडचे पालकमंत्री पदही भूषवले आहे.

दरम्यान भाजपाकडून पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांपासून मिसाळ पुण्यात काम करत आहेत. नगरसेविका ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्याव्यतिरिक्त जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनाही राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत मेघना बोर्डीकरांनी (Meghana Bordikar) विजय मिळवला आणि आता त्याचे फळ म्हणून त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.(Maharashtra Cabinet Expansion)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.