Bajrang Dal : पुरुषार्थ जागरणासाठी बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचलन; तब्बल १० हजार कार्यकर्ते संचलनात सहभागी

650

६ डिसेंबर १९९२ रोजी प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील जन्मभूमीवरील अपमानाचे चिन्ह असलेला बाबरी सांगाडा जमीनदोस्त झाला. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर हिंदू समाजाचा पुरुषार्थ जागृत झाला, तो दिवस होता गीता जयंतीचा. त्या दिवसानंतर हिंदू समाजाने कात टाकली. देशातील सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाच्या केंद्रस्थानी हिंदुत्व विराजमान झाले. गीता जयंतीच्या दिवशीच योगेश्वर कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली आणि त्यांच्यातील पुरुषार्थ जागृत केला होता. ३२ वर्षापूर्वी गीता जयंतीच्या दिवशीच हिंदू समाजाने पराक्रम केला आणि गुलामीचे चिन्ह जमीनदोस्त केले. त्या दिवसाची आठवण भारतातील अर्जुनरुपी युवकांना करून देण्यासाठी बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येकवर्षी करत असते. या वर्षी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) वतीने कोंकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी रायगड, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी ८ डिसेंबर २०२४ रोजी शौर्य संचलन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता राजा बडे चौक येथे तब्बल १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शौर्य संचलन पार पडले.

शौर्य संचलनात बजरंग दलाच्या (Bajrang Dal) गणवेशात शिस्तबद्ध रित्या कार्यकर्त्यानी संचलन केले. संचलन नंतर राजा बडे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सैन्य दलातील कमांडर मा. भूषण देवन व प्रमुख वक्ते म्हणून श्री स्वामी विज्ञानानंद उपस्थित होते. या संचलनात १० हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “गीता जयंतीच्या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने प्रत्येक वर्षी शौर्य संचलनाचे आयोजन केले जाते” असे प्रस्तावना करताना गौतम रावरीया बजरंग दल कोंकण प्रांत सहसंयोजक यांनी सांगितले.

बजरंग दलाच्या (Bajrang Dal) मुंबई क्षेत्राचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी सांगितले, “बाबर सहित सर्वच इस्लामी आक्रांतानी या देशातील मंदिरा उध्वस्त करून संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, हे दहशतवादाचे सर्वप्रथम उदाहरण आहे. हिंदूंच्या महिला मुलींना लव्ह जिहाद करून बाटवणं, हिंदूंचे आराध्य गोमतेला कापणे हे सर्व या भारतावर इस्लामी दहशतवादाचे राज्य स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत, परंतु बजरंग दल हे कदापि होऊ देणार नाही. हिंदूंना जाती-पातीत, प्रांतवाद, भाषावाद मध्ये विभागण्याचे काम काही असामाजिक तत्व करत आहे परंतु बजरंग दल हे होऊ देणार नाही. लोकसंख्येचा संतुलनासाठी हिंदूंनी किमान ३ बालकांना जन्म द्यावा. देशात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे असणे हे लँड जिहादचे एक उदाहरण आहे. इस्लामी आतंकवाद्यांचे स्लीपर सेल्स या देशात आहेत ते शोधून काढत उध्वस्त करण्याचे काम येत्या काळात बजरंग दलाचे कार्यकर्ते करतील.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान )

१९७१ च्या युद्धात सहभागी झालेले सैन्य दलातील कमांडर प्रमुख अतिथी मा. भूषण देवान यांनी सांगितले, “आम्ही आक्रमकांना प्रखरतेने त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करू. बजरंग दल (Bajrang Dal) जे बोलतो, ते करून दाखवतो हा बजरंग दलाचा इतिहास आहे. फक्त अयोध्या, मथुरा, काशी नव्हे तर या देशातील ज्या ज्या मंदिरावर अतिक्रमण झालं ते प्रत्येक मंदिर आम्ही परत घेऊ. येत्या काळात पाश्चात्य देशांच्या युद्धांमध्ये सनातन धर्म अवघ्या जगभरात राज्य करू शकतो. आम्ही देशातील सर्वच्या सर्व ३० हजार मंदिरात ज्याच्यावरती इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमण केले होते ते परत घेऊ. आक्रमकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वर्ल्ड इकॉनोमिक कोरम चे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले, आपण सर्वच शूरवीर, परमप्रतापी योद्धांचे वंशज आहोत. या देशावर कित्येक आक्रमकानी आक्रमण केले परंतु तरीही या देशाची सभ्यता संस्कृती कोणीही मिटवु शकले नाही. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या सर्व जिहाद्यांना सुद्धा सांगू इच्छितो की भारतीय सेना ही ढाक्यापर्यंत घुसून यांचा माज उतरवू शकते. हिंदूंनी इथून पुढे शत्रूंप्रति कसलीही दया न दाखवता त्यांना त्यांच्या भाषेत आक्रमकतेने उत्तर दिले पाहिजे. देशातील युवकांनी हे विसरता कामा नये की या देशात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू अशा कित्येक क्रांतिकारकांनी बलिदान दिल्यामुळे आज आपण स्वतंत्र आहोत. हा देश बलिदानाने, शौर्याने बनलेला आहे. देशाचे रोल मॉडेल बॉलिवुडचे हिरो नसून बलिदान देणारे असंख्य क्रांतिकारक आहेत. विवेक कुलकर्णी बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक, मोहन सालेकर कोंकण प्रांत मंत्री, रणजित जाधव बजरंग दल (Bajrang Dal) प्रांत संयोजक, गौतम रावरीया प्रांत सहसंयोजक उपस्थित होते.

देव, देश, धर्म रक्षणासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते नेहमीच सज्ज असतात. त्याचसोबत युवकांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान, सामाजिक समरसता वृद्धिंगत होण्यासाठी सेवा उपक्रम, राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रम बजरंग दल वर्षभर राबवत असते. बजरंग दल या माध्यमातून समाजातील तमाम युवकांना देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी, देशभक्त युवकांची फळी निर्माण करण्यासाठी बजरंग दलात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करते आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.