Satara जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप!

151
Satara जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप!
Satara जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप!
  • खास प्रतिनिधि

फडणवीस मंत्रिमंडळात सातारा (Satara) जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले असून तब्बल पाच मंत्रीपदे एकट्या सातारा जिल्ह्याच्या वाट्याला आली आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मतदार संघ ठाणे जिल्ह्यात असला तरी त्यांची ओळख मूळचे सातारा जिल्ह्यातील असून त्यांच्या व्यतिरिक्त अन्य चार सातारा जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांनी रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज

यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. शिवेंद्रराजे हे सातारा (Satara) विधानसभा मतदार संघातून १.४२ लाख मताधिककयाने निवडून आले आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Winter Session : विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार)

फडणवीस यांच्याशी जवळीक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे समजले जाणारे माण या विधानसभा मतदार संघातून दीड लाख मतधिककयाने निवडून आलेले जयकुमार गोरे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले असल्याने सर्वांच्या भुवया उचवल्या आहेत.

शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाचे माजी मंत्री शंभुराज देसाई यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. देसाई हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तिय समजले जातात.

(हेही वाचा – Cabinet Expansion Maharashtra : महायुतीच्या ‘या’ आमदारांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ)

राष्ट्रवादीचा एक आमदार

तर राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वाई मतदार संघातील आमदार मकरंद जाधव-पाटील यांनाही मंत्रिमंडळात बढती देण्यात आली आहे. मकरंद जाधव यांनी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा ६१,००० मतांनी पराभव केला.

पुण्याला चार मंत्रीपदे

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रीपदे आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह भाजपाचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दत्त भरणे आणि पुण्याच्या भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील माधुरी मिसाळ या राज्यमंत्री असतील तर अन्य कॅबिनेट मंत्री आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.