जगप्रसिद्ध तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी त्यांची प्राण ज्योत मावळली.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी विरोधकांना दिली गाईडलाईन; अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हा; पण…)
सुमारे २ वर्षांपूर्वी झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे स्टेंटही देण्यात आला होता. दरम्यान दिव्य मराठी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे निधन झाले आहे. कलाक्षेत्रातही त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.
७व्या वर्षी केली झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांनी तबला शिकण्यास सुरुवात झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लारखा खान (Alla Rakha khan) यांचे पुत्र होते. अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला हे वाद्य वाजवले आहे. त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. अशा हरहुन्नरी कलाकाराच्या निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community