शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या; Amit Shah यांचा नक्षलवाद्यांना इशारा

74
शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या; Amit Shah यांचा नक्षलवाद्यांना इशारा
शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या; Amit Shah यांचा नक्षलवाद्यांना इशारा

मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होईल. मी नक्षलवाद्यांना आवाहन करतो, कृपया पुढे या. शस्त्र सोडा, शरण या आणि मुख्य प्रवाहात या. तुमचे पुनर्वसन ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही शरण येऊन मुख्य प्रवाहात आलात, तर तुम्ही छत्तीसगड आणि भारताच्या विकासासाठी योगदान द्याल. बस्तरमधील नक्षलवाद संपला, तर येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे काश्मीरपेक्षा अधिक पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. बस्तरच्या विकासाची नवी गाथा यामुळे लिहिली जाईल आणि नक्षलवादाच्या पूर्ण निर्मूलनाचा मजबूत पाया तयार होईल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. छत्तीसगडच्या जगदलपूर येथील कार्यक्रमात १५ डिसेंबर या दिवशी ते बोलत होते.  (Amit Shah)

(हेही वाचा- Cabinet Expansion : …तर अडीच वर्षांच्या आतही जाऊ शकते मंत्रीपद; संजय शिरसाट असे का म्हणाले ?)

शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच या वेळी गृहमंत्र्यांनी दिला. अमित शाह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या काळात माओवाद्यांविरुद्धची कारवाई मंदावली होती. पण, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २८७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले, ९९२ जणांना अटक करण्यात आली आणि ८३६ जण शरण आले. मोदी सरकारच्या काळात सुरक्षा दलातील मृत्यू ७३ टक्क्यांनी, तर नागरिकांच्या मृत्यूत ७० टक्क्यांची घट झाली आहे. (Amit Shah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.