Ind vs Aus, Brisbane Test : विराट कोहली पुन्हा स्वस्तात बाद, चाहते विराटवर चिडले 

Ind vs Aus, Brisbane Test : विराटने आता धोनीप्रमाणे निवृत्त व्हावं असं मत व्यक्त होत आहे

84
Ind vs Aus, Brisbane Test : विराट कोहली पुन्हा स्वस्तात बाद, चाहते विराटवर चिडले 
Ind vs Aus, Brisbane Test : विराट कोहली पुन्हा स्वस्तात बाद, चाहते विराटवर चिडले 
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभा केलेला असताना भारतीय फलंदाजी पहिल्या डावांत पुन्हा एकदा ढेपाळली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली डावाच्या दहाव्या षटकांतच ३ धावा करून बाद झाला आहे. उजव्या यष्टीबाहेर जाणारा चेंडू खेळण्याची जुनी सवय विराटसाठी अवसानघातकी ठरत आहे. या चुकीमुळे तो सतत झटपट बाद होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पर्थ कसोटीतील शतक सोडलं तर त्याच्या धावा आहेत – ५, ११, ७ आणि ३. भारतीय संघाला विराटसारख्या अनुभवी खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना विराट फलंदाजीच्या तांत्रिक चुकीमुळे सतत बाद होत आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- मी अडीच महिन्यांसाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो; Ajit Pawar यांच्या मिश्किल उत्तराने पिकला हशा)

ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जयसवाल (४) आणि शुभमन गिल (१) झटपट बाद झाले असताना विराट कोहली मैदानावर आला. पण, तो ही जेमतेम १३ चेंडू टिकला. जोश हेझलवूडचा एक चेंडू विराटला सोडून देता आला असता. पण, विराटने तो खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक ॲडम केरीकडे गेला. तंबूत परतताना विराट कष्टी झालेला दिसत होता. (Ind vs Aus, Brisbane Test)

विराटच्या या सततच्या अपयशामुळे आता त्याच्या चाहत्यांचाही तोल ढळत चालला आहे. सोशल मीडियावर विराटने निवृत्त व्हावे अशी मागणी सुरू झाली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Mahakumbh : प्रयागराज येथे कुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात)

कोहलीच्या या मालिकेतील धावा, 

पर्थ कसोटी – ५ व नाबाद १००

ॲडलेड कसोटी – ७ व ११

ब्रिस्बेन – ३ 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.