-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत सध्या फक्त एकच गोष्ट भारतीयांच्या बाजूने घडत आहे. ती म्हणजे जसप्रीत बुमराहची गोलंदाजी. फलंदाज अपयशी ठरत असताना बुमरा मात्र एका बाजूने नेटाने आपलं काम करत आहे. ब्रिस्बेनमध्येही ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी शतक झळकावत भारतीय गोलंदाजी फोडून काढलेली असताना बुमरा मात्र त्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न करतच होता. त्याने ७६ धावांत ६ बळी मिळवत आधी आघाडीची फळी तंबूत पाठवली. मग जुन्या चेंडूवरही त्याने मोलाचे बळी मिळवले. जम बसलेल्या ट्रेव्हिस हेडलाही त्यानेच बाद केलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
या मालिकेत त्याने दुसऱ्यांदा ५ बळी मिळवले आहेत. ते करताना कपिल देवचा एक जुना विक्रमही त्याने मोडीत काढला आहे. मॅकस्विनी, ख्वाजा या आघाडीच्या फळीला बाद करण्याबरोबरच त्याने दुसऱ्या टप्प्यात स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे फलंदाजही बाद केले. तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला बाद करत बळींची संख्या सहावर नेली. एकूण २८ षटकांत ७६ धावा देत त्याने ६ बळी मिळवले. षटकामागे त्याने जेमतेम २.७१ धावा दिल्या. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- मी अडीच महिन्यांसाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो; Ajit Pawar यांच्या मिश्किल उत्तराने पिकला हशा)
बुमराहने भारताबाहेरच्या खेळपट्टीवर १० व्यांदा डावांत ५ बळी मिळवले. कपिल देवने यापूर्वी ९ वेळा अशी कामगिरी केली होती. बुमराहने आता कपिलला मागे टाकलं आहे. परदेशातील सगळ्यात यशस्वी भारतीय तेज गोलंदाज होण्याचा मान त्याने पटकावला आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी तीनदा ५ बळी मिळवले आहेत. तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये त्याने प्रत्येकी दोनदा डावांत ५ बळी मिळवले आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या कसोटी क्रिकेटमधील महासत्ता समजल्या जातात. त्यांचा उल्लेख संयुक्तपणे ‘सेना’ असा होतो. देशांच्या अद्याक्षरावरून या समुहाला हे नाव पडलं आहे. तर सेना देशांविरुद्ध त्यांच्याच मैदानात ५ बळी घेण्याची कामगिरी ८ वेळा केली आहे. कपिलने अशी कामगिरी ७ वेळा केली होती. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा)
आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या या हंगामात बुमराने ९ वेळा डावांत ५ बळी मिळवले आहेत. या बाबतीत तो ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नॅथन लिऑनने १० तर रविचंद्रन अश्विनने ११ वेळा ही कामगिरी या हंगामात केली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community