Ind vs Aus, Brisbane Test : ट्रेव्हिस हेड, बुमराह आणि जडेजावर नेमकं काय म्हणाला?

Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेनमध्ये ट्रेव्हिस हेडने पहिल्या डावांत १५२ धावा केल्या

318
Ind vs Aus, Brisbane Test : ट्रेव्हिस हेड, बुमराह आणि जडेजावर नेमकं काय म्हणाला?
Ind vs Aus, Brisbane Test : ट्रेव्हिस हेड, बुमराह आणि जडेजावर नेमकं काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेडने भारतीय गोलंदाजांवर पुन्हा एका हुकुमत गाजवताना या मालिकेत सलग दुसरं शतक झळकावलं. बुमराहने आघाडीची फळी झटपट कापून काढली असताना स्मिथसह द्विशतकी भागिदारी करताना सामनाही भारतापासून दूर नेला. अगदी गेल्यावर्षी एकदिवसीय विश्वचषकापासून हेड भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. हेडने १६० चेंडूंत १५२ धावा केल्या. पण, त्याचवेळी या घणाघाती खेळीविषयी बोलताना त्याने जसप्रीत बुमराहविषयी आदरच व्यक्त केला आहे. ‘कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराच्या तोफखान्यापासून नशिबानेच वाचलो,’ असं हेड म्हणाला आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- मी अडीच महिन्यांसाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो; Ajit Pawar यांच्या मिश्किल उत्तराने पिकला हशा)

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील शतक, त्यानंतर कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत केलेलं शतक आणि आता या मालिकेत सलग दोन कसोटींमध्ये शतकं यामुळे ट्रेव्हिस हेडला झटपट कसं बाद करायंच हा भारतासमोरचा मोठा प्रश्न ठरला आहे. शिवाय हेड ज्या गतीने धावा करतो, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तो पुढे घेऊन जातोय. (Ind vs Aus, Brisbane Test)

‘बुमराला दुसऱ्या दिवशी नवीन चेंडूवर खेळणं अवघड होतं. पण, ते काम पहिल्या तीन फलंदाजांनी केल्यामुळे माझं काम सोपं झालं. मला मनाप्रमाणे फलंदाजी करता आली. मला एकदा जम बसल्यावर मोठी खेळी खेळायला आवडते. आक्रमक फलंदाजी करता आली की, मी त्याची मजा लुटतो. ते शक्य झालं याबद्दल मी सहकाऱ्यांचा आभारी आहे,’ असं हेड या शतकानंतर म्हणाला. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : विराट कोहली पुन्हा स्वस्तात बाद, चाहते विराटवर चिडले )

बुमराहचं मात्र हेडने कौतुक केलं. ‘बुमराह जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध खेळायचं दडपण असतंच. सुरुवातीला त्याला जपून खेळत होतो. तो ही कुठल्याही चेंडूवर बळी मिळवेल अशी गोलंदाजी करत होता. पण, हळू हळू चेंडू जुना होत गेला. काम सोपं झालं. दुसऱ्या बाजूने स्टिव्ह स्मिथ असल्यामुळेही आधार वाटत होता. बुमराह आणि जडेजा यांच्याविरुद्ध सुरुवातीला मी सावध होतो,’ असं हेडने बोलून दाखवलं. (Ind vs Aus, Brisbane Test)

ट्रेव्हिस हेडने या मालिकेत भारताविरुद्ध ८१, १४२ आणि १५२ अशा खेळी साकारल्या आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.