विधीमंडळाच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात (winter session of maharashtra assembly) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक सादर केले. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत हे सादर केले. गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत असून, याला पायबंद घालण्यासाठी महायुती सरकार कायदा करणार आहे. (Alcohol Consumption at Forts)
(हेही वाचा – सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी; Pradhanmantri Sangrahalaya ने पाठवले पत्र)
एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा
“हे विधेयक खूप महत्त्वाचे आहे. गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणे, तिथल्या इमारतींचे नुकसान करणे, याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काहीही तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारचे दहशत निर्माण होईल, अशा प्रकारची तरतूद असलेले हे विधेयक आहे”, असे सुधारणा विधेयक सादर करतांना चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात अनेकदा किल्ल्यांवर दारू, ड्रग्स सेवन करून धिंगाणा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. अशा प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी विधानसभेत वारंवार केली गेली होती. त्यानंतर आता सरकारने शिक्षेचा कालावधी आणि दंडांच्या रकमेत वाढ केली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. नंतर याचा मसुदा तयार करण्यात आला. यापूर्वी २०२० मध्ये सरकारने असा गुन्हा करणाऱ्यांना १ वर्ष कारावास आणि दहा रुपये दंडांची शिक्षा करण्याची तरतूद केली होती. (Alcohol Consumption at Forts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community