- प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना आणि त्याचा साथीदार कादर गुलाम शेख उर्फ कादिर फँटा या दोघांना शुक्रवारी डोंगरीच्या टनटनपुरा स्ट्रीट आणि नागपाडा वॉटर लेन येथून अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडून करण्यात आली आहे. दानिशला मागील तीन वर्षांत दुसऱ्यांदा अटक झाली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने डोंगरी येथे केलेल्या ड्रग्जच्या कारवाईनंतर पळून गेलेल्या दानिश मर्चंट उर्फ चिकना याला राजस्थानच्या कोटा येथून अटक केली होती अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Crime)
दानिश मर्चंट हा ड्रग्जचे सिंडिकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दानिशचे वडील अश्रफ मर्चंट हे १९८०-९० च्या काळात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या निकटवर्तीयांपैकी एक होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी २०२१ मध्ये डोंगरी येथील ड्रग्जवर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेवर छापा टाकला होता. या प्रकरणात एनसीबीने आरिफ भुज यांच्यासह काही जणांना अटक केली होती. दानिश मात्र तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याला एनसीबीने राजस्थानमधील कोटा येथून अटक केली होती. (Crime)
(हेही वाचा – Alcohol Consumption at Forts : गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना सरकार देणार दणका; विधानसभेत विधेयक सादर)
८ नोव्हेंबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी मोहम्मद आशिकुर रहमान याला १४४ ग्रॅम गांजासह अटक केल्यानंतर डोंगरी येथील खडक परिसरात राहणाऱ्या रेहान शकील अन्सारी याच्याकडून अमली पदार्थ खरेदी केल्याचे रेहमानने पोलिसांना सांगितले. रेहानला अटक केली असता त्याच्याकडे ५५ ग्रॅम गांजा पोलिसांना सापडला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, त्यांच्या चौकशीदरम्यान रेहानने दानिश मर्चंट आणि कादर शेख यांच्याकडून गांजा खरेदी केल्याचे उघड झाले. (Crime)
पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू केला होता. शेवटी आमच्या पथकाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना आणि त्याचा साथीदार कादर गुलाम शेख उर्फ कादिर फँटा या दोघांना शुक्रवारी डोंगरीच्या टनटनपुरा स्ट्रीट आणि नागपाडा वॉटर लेन येथून अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या दोघांवर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या भारतीय न्याय संहितेचे कलम १११ देखील या प्रकरणात जोडले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community