WPL Auction : डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेख कोण आहे?

WPL Auction : सिमरन शेखवर गुजरात जायंट्सनी १.९ कोटी रुपयांची बोली लावली.

73
WPL Auction : डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेख कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईकर क्रिकेटपटू सिमरन शेख डब्ल्यूपीएलच्या लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू ठरली आहे. गुजरात जायंट्स संघाने तिला १.९ कोटी रुपयांत विकत घेतलं. बंगळुरूत झालेल्या या लिलावात अनुभवी स्नेह राणा मात्र विक्रीशिवाय राहिली. एकूण १२० खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते आणि ५ संघांना मिळून १९ रिक्त जागा भरायच्या होत्या. अशावेळी सिमरनच्या खालोखाल बोली लागली ती वेस्ट इंडिजच्या डिंड्रा डॉटिनवर (गुजरात जायंट्स – १.७ कोटी) तर कमलिनी (मुंबई इंडियन्स – १.६ कोटी), प्रेमा रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १.२ कोटी) आणि एन चरणी (दिल्ली कॅपिटल्स – ५५ लाख) यांच्यावर. (WPL Auction)

(हेही वाचा – Crime : दाऊद टोळीतील दानिश चिकनाला डोंगरी येथून ड्रग्ज प्रकरणात अटक)

२२ वर्षीय सिमरनसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात जोरदार चुरस होती. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळताना तिने ११ सामन्यांत १००.६ च्या स्ट्राईकरेटने १७६ धावा केल्या होत्या. त्या हंगामात ती युपी वॉरियर्स संघात होती. अखेर गुजरात संघाने लिलावातील सर्वाधिक रक्कम १.९ कोटी रुपये मोजून सिमरनला ताफ्यात घेतलं. गुजरात संघाने वेस्ट इंडिजच्या डॉटिनवरही १.७ कोटींची बोली लावली. सध्या विंडिज महिला संघ भारताच्या दौऱ्यावर आहे आणि मालिका भारतीय महिलांनी जिंकली असली तरी डॉटिनची कामगिरी भक्कम आहे. (WPL Auction)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : माजी महिला क्रिकेटपटू ईसा गुहाने मागितली बुमराहची जाहीर माफी)

डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामातील विजेते बंगळुरू संघाने प्रेमा रावतसाठी १.२० कोटी रुपये मोजले. तर नुकतीच भारतीय संघात प्रवेश केलेली उत्तराखंडची खेळाडू नंदिनी कश्यपवर दिल्ली कॅपिटल्स संघाने बोली लावली. बंगळुरू संघाने राधवी बिश्त, जोशिता जेव्ही आणि जागरवी पवार यांना ताफ्यात घेतलं आहे. लिलावात १२० खेळाडूंचा समावेश होता. पण, भारताकडून खेळलेल्या माजी खेळाडूंवर बोली लागली नाही. उलट संघांचा ओढा नवीन खेळाडूंकडेच होता. (WPL Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.