- खास प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात, रविवारी १५ डिसेंबर २०२४, या दिवशी १२ दिग्गज माजी मंत्र्यांना डच्चू मिळाल्यानंतर, सोमवारी १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाकडे यातील काही नाराज आमदारांनी पाठ फिरवली. (Cabinet)
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. यावेळी मंत्रिमंडळातून वगळलेले भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच शिवसेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सभागृहात येणे टाळले. केसरकर सभागृहात पोहोचले मात्र पहिल्या दिवसाचे कामकाज तोपर्यंत संपले होते. (Cabinet)
(हेही वाचा – काँग्रेसने स्वार्थासाठी घटनादुरूस्ती केली; Nirmala Sitharaman यांचा काँग्रेसला टोला)
भुजबळ नाराज
इतर माजी मंत्री भाजपाचे रविंद्र चव्हाण, सुरेश खाड्ये, विजय कुमार गावित तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील आणि संजय बनसोडे हे नाराज असले तरी त्यांनी सभागृहात हजेरी लावल्याचे दिसले. भुजबळ यांनी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर मध्यमांशी बोलताना उघड नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि भाजपाच्या मंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त करण्याचे धाडस दाखवले नाही. (Cabinet)
(हेही वाचा – Dog Bite: कल्याणमध्ये गंभीर घटना; भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू)
अजित पवारही गैरहजर
भुजबळ यांनी सभागृहात येताना काळ्या रंगाचा जोधपुरी ड्रेस परिधान केला होता आणि लाल रंगाचा स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळला होता. कदाचित, त्यांना काळ्या रंगाच्या माध्यमातून मंत्री पद न दिल्याचा निषेध नोंदवायचा असावा, अशी चर्चा विधिमंडळ परिसरात होत होती. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोमवारी पहिल्या दिवशी अधिवेशनात डावललेल्या मंत्र्यांची नाराजी ओढवून घेण्याचे टाळण्यासाठी गैरहजर राहील्याची चर्चा होत होती. (Cabinet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community