भाजपाचे (BJP) माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांची समजूत काढली जात असून पक्षातील इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. ते आज (१६ डिसेंबर) नागपुरातील विधानभवनाबाहेर बोलत होते. यावेळी फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवार यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात का स्थान नाही, यावर भाष्य केलं.
हेही वाचा-बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती
“माझी सुधीर मुनंगटीवार यांच्याशी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे काहीवेळा सरकारमध्ये काम करणारे पक्षात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर मुनगंटीवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही.” असे देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
हेही वाचा-संतोष देशमुखांच्या हत्येची एसआयटी चौकशी होणार ; CM Devendra Fadnavis
नाराजीच्या चर्चांवर बोलताना सुधीर मुनंगटीवार म्हणाले, “मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे.” (Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community