Women and Child Development वरून भाजपा-राष्ट्रवादीत रस्सीखेच!

59
Women and Child Development वरून भाजपा-राष्ट्रवादीत रस्सीखेच!
  • खास प्रतिनिधी

एकेकाळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असलेल्या दोन माजी मंत्री आता फडणवीस मंत्रिमंडळात एकत्र आल्याने महिला-बाल कल्याण खात्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. (Women and Child Development)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या आरोग्याकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष?)

मुंडे की तटकरे?

नागपुरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज भवनच्या हिरवळीवर रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात चार महिला आमदार असून भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. मुंडे आणि तटकरे या दोघी महिला-बाल कल्याण खात्याच्या माजी मंत्री राहिल्याने यावेळी महिला-बाल कल्याण खाते कुणाच्या वाट्याला जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Women and Child Development)

(हेही वाचा – नेहरूंच्या पळवलेल्या पत्रांमध्ये असे काय आहे ज्यामुळे गांधी कुटुंब देशवासियांपासून ती लपवत आहेत; Sambit Patra यांचा हल्लाबोल)

तेव्हा मुंडे नव्हत्या..

पंकजा मुंडे या २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस सरकारमध्ये महिला-बाल कल्याण खात्याच्या मंत्री राहिल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारमध्ये आदिती तटकरे यांच्याकडे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला होता. दीड वर्षापूर्वी अजित पवार हे शरद पवार यांच्याशी फारकत घेत ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी आदिती सुनील तटकरे यांनीही अजित पवार यांना पाठींबा देत शरद पवार यांची साथ सोडली. तेव्हा महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये तटकरे यांच्याकडे पुन्हा महिला-बाल कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला. त्यावेळी पंकजा मुंडे या मंत्रिमंडळाचा भाग नव्हत्या. (Women and Child Development)

(हेही वाचा – मुंबई उपनगरात एम्सच्या धर्तीवर रुग्णालय व कॅन्सरवर संशोधन केंद्र उभारा – MP Ravindra Waikar)

अधिकाऱ्यांनाही धाकधूक

सदया अस्तित्वात आलेल्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा आणि आदिती या दोघींनी मंत्री पदाची शपथ घेतली, तर अद्याप खातेवाटप होणे बाकी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, येत्या दोन दिवसांत खातेवाटप होईल. त्यामुळे दोन दिवस महिला-बाल कल्याण या खात्यातील अधिकारी तसेच मुंडे आणि तटकरे समर्थक यांना, हे खाते कोणाला मिळणार याची धाकधूक लागून राहिली आहे. (Women and Child Development)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.