बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती

669
Assembly Winter Session : शहरी नक्षलवाद विरोधी विशेष कायद्याचे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवणार !
  • नागपूर, विशेष प्रतिनिधी

मुंबईतील बेस्टच्या अनेक बस जुन्या झाल्या असल्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १३०० बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची ऑर्डर काढली असून लवकरच बेस्टच्या ताफ्यात या बसेस दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिली. बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त, बेस्टचे प्रमुख यांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच कुर्ला येथील दुर्घटनेतील वाहन चालकाने कोणतीही नशा केली नव्हती, असे निष्पन्न झाल्याचा खुलासा त्यांनी केला.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या !)

शिवसेना (उबाठा) आमदार सुनील शिंदे यांनी पहिल्याच दिवशी मुंबईतील बेस्ट बस अपघात प्रकरणी २८९ स्थनग प्रस्ताव मांडला. मुंबईत एकाच आठवड्याच कुर्ला आणि गोवंडीसह बेस्ट बसचा अपघात झाला. कुर्ला येथील घटनेत ७ जण दगावले. तर ४२ जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मागील वर्षभरात बेस्टचे ३४७ अपघात झाले. अनेक निष्पांपाच यात बळी गेले. आर्युमान संपलेल्या गाड्या रस्त्यावर आल्याने अपघात वाढत आहेत. नवीन बस गाड्या खरेदीसाठी बेस्ट परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. परिणामी मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच आयुर्मान संपलेल्या बस गाड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन मांडत, सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – मुंबई उपनगरात एम्सच्या धर्तीवर रुग्णालय व कॅन्सरवर संशोधन केंद्र उभारा – MP Ravindra Waikar)

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, बेस्टचे होणारे अपघात ही गंभीर घटना आहे. सरकार यावर नक्कीच गांभीर्यपूर्वक चर्चा करेल. जो अपघात घडला त्यासंदर्भात चालकाची अल्कोहोलची टेस्ट केली. परंतु, त्यामध्ये तसे काहीही आढळलेले नाही, तरीही त्याबाबत चालकांची अचानक तपासणी सुरु केली आहे. तथापि, या अपघातांमधील सर्व वस्तूस्थिती जाणून घेऊन बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्तांना बेस्टच्या प्रमुखांसोबत बसून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.