कर दात्यांसाठी महत्त्वाची सूचना! ITR ची अंतिम मुदत डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत वाढवली 

102

आर्थिक वर्ष २०२३-२४ (मूल्यांकन वर्ष २०२४-२५) साठी इन्कम टॅक्स (ITR last date) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. परंतु काही कारणास्तव ज्या करदात्यांना मुदतीत रिटर्न भरता आले नसेल, अशा करदात्यांना आयकर कायदयातील तरतुदीनुसार काही दंड भरून करदाते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिटर्न भरता येणार आहे ज्याला विलंबित रिटर्न म्हणतात. (ITR)

आयकर विवरणपत्र (Income Tax Return) हे निर्धारित वेळेतच भरले पाहिजे तुमच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची अचूक माहिती रिटर्न मध्ये सादर केली पाहिजे. जेणेकरून भविष्यात तुम्हाला आयकर विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या नोटिसांना सामोरे जावे लागणार नाही. विलंबित इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंगसाठी दंडाची (Income Tax Return Filing Penalty) रक्कम ही वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असल्यास कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. परंतु ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास १,००० पर्यंत दंड आहे. वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास रु. ५ हजार पर्यंत दंडआहे. करदात्यांना रिटर्न दाखल करतेवेळी उपलब्ध असलेल्या सर्व वजावटी/सूट घेतल्या नंतर जर काही टॅक्स लागणार असेल तर तो देखील भरावा लागणार आहे.

(हेही वाचा – Cabinet मधून डच्चू मिळालेल्या माजी मंत्र्यांनी अधिवेशनाकडे फिरवली पाठ!)

जे करदाते (taxpayers) आयकर कायद्याच्या चौकटीत येत असूनही रिटर्न फाईल करत नसेल तर त्यांना भविष्यात अनेक कायदेशीर कारवाईला समोर जावे लागू शकते. अशा करदात्यांना आयकर विभाग नोटीस जारी करू शकतो. टॅक्स (Tax) मूल्याच्या ५०% पासून ते २००% पर्यंत दंड आकारला जावू शकतो. आयटी रिटर्न हे तुमच्या उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून ते विविध कामकाजाकरिता उपयोगी पडत असते त्यामुळे ते नियमित दाखल केल्याने फायदाच होणार आहे.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.