- खास प्रतिनिधी
प्रभादेवी येथील प्रसिद्ध स्वयंभू, श्री सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्तांची संख्या ९ वरून १५ इतकी करण्याचा, तसेच विश्वस्त समितीचा कालावधी ३ ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. याबाबतचे विधेयक ‘श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) विधेयक, २०२४’ सोमवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आले असून त्यावर चर्चा होऊन मंजुरीसाठी मताला टाकण्यात येईल. (Siddhivinayak)
(हेही वाचा – World Athletics Tour 2025 : भारतात पुढील वर्षी होणार ॲथलेटिक्सची आंतरराष्ट्रीय स्पर्धा)
चर्चा होऊन मंजूर होणार
सोमवारी १६ डिसेंबर २०२४ या दिवशी, हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी, सुधारणा सुचवणारे विधेयक विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सादर केले. आता यावर चर्चा होऊन मंजूर होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असून आता विधेयकानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. (Siddhivinayak)
(हेही वाचा – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण द्या; खासदार Naresh Mhaske यांची केंद्र सरकारकडे मागणी)
उत्तम प्रशासनासाठी
या विधेयकाद्वारे एक सभापती, एक कोषाध्यक्ष आणि १५ पेक्षा अधिक संख्या नसेल अशी समिती स्थापन करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच भक्तांसाठी अधिक चांगल्या सुविधा पुरविणे तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणे आणि विश्वस्तव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन आणि उत्तम प्रशासन करणे शक्य व्हावे यासाठी, व्यवस्थापन समितीच्या इतर सदस्यांची एकूण संख्या नऊ वरून १५ इतकी वाढविणे आणि समितीच्या सदस्यांचा पदावधी, तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे आपल्या निवेदनात नमूद केले आहे. (Siddhivinayak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community