- प्रतिनिधी
पंतप्रधान नेहरु यांनी लिहिलेल्या लॉर्ड माउंटबॅटन आणि एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आईनस्टाईन यांना लिहिलेली पत्रांचा विषय सोमवारी लोकसभेत चांगलाच गाजला आणि त्यावरून गोंधळ बघायला मिळाला. ही पत्रे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयातून परत का घेतली?, असा प्रश्न उपस्थित करत ती पत्रे गांधी कुटुंबीयांनी परत करावी अशी मागणी भाजपाने (BJP) लोकसभेत केली. याचा विरोध काँग्रेस खासदारांनी केला. यामुळे लोकसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. खासदार प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये हा गोंधळ सुरु होता. भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी या विषयावरुन काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले.
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या खासगी पत्रांमध्ये त्यांनी एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आईनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा आसण अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे. ही पत्रे परत द्यावीत, अशी विनंती राहुल गांधी यांना करण्यात आली आहे. कारण ही पत्र सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रांमध्ये असे काय गुपित आहे की, ती कुटुंबीयांनी जवळ ठेवली आहे, ती परत करावी अशी मागणी सोमवारी भाजपाच्या (BJP) वतीने करण्यात आली. त्यावरून संसदेत बराच गोंधळ झाला.
(हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानींविरुद्ध अमेरिकेकडे भक्कम पुरावे, अटक मात्र अशक्य)
नेहरूंच्या पत्रांवर काय आहे वाद?
26 वर्षांनी देणगी दिल्यानंतर सोनिया गांधींनी पत्रे परत का घेतली? पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची काही महत्त्वाची पत्रे 51 खोक्यांमध्ये सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचा दावा जात केला आहे. दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी हा दावा केला असून ती परत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संग्रहालयाच्यावतीने आधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधींना याबबात पत्र लिहिण्यात आले आहे.
पंतप्रधान संग्रहालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यावरून सोमवारी लोकसभेत हंगामा झाला. भाजपाने (BJP) हा मुद्दा उचलून धरत त्या पत्रांमध्ये काय आहे, हे देशाला समजायला हवे. त्यासाठी ही पत्रे परत द्यायला हवीत, अशी मागणी भाजपाने केली आहे. दरम्यान, कादरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना यूपीए सरकारच्या काळात 2008 मध्ये संग्रहालयातील काही पत्रे 51 खोक्यांमध्ये देण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू मेमोरियलने ही पत्रे 1971 मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियमला (आता पंतप्रधान संग्रहालय) दिली होती. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community